Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

ऐरोली नवी मुंबई येथील भूमीपुत्र – प्रकल्पग्रस्तकोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर कोळी भवनाचे भूमीपूजन आज संपन्न झाले आहे. हा भूखंड मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कोळी भवन उभे राहत आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. नवी मुंबईतील सर्वांत सुंदर कोळी भवन झाले पाहिजे. निधी कमी पडू दिला जाणार नाही. महाराष्ट्रात अटल सेतू तयार केला तेव्हा मासेमारी करता येत नाही, त्याच्यासाठी आपण कॅपेक्शन देतो म्हणून आपण 25 कोटी रुपये देण्याची तरतूद केली आहे. आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूनी खंबीरपणे उभे आहे.

ते म्हणाले, अठरा हजार कोळी बांधवाना जातपडताळणी नसल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात  येणार होते. त्यांना अधिसंख्य पदावर घेतले. आम्ही त्यांना कायमस्वरुपी कर्मचारी केले. इतर कर्मचारी जे लाभ घेतात ते सर्व लाभ त्यांना आपण दिले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कोळी बांधवाचा साकल्याने विचार झाला. केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रीपद तयार केले. स्वतंत्र खाते तयार केले. मस्यसंपदा योजना सुरू केली. देशातील सर्वात मोठे पॅकेज आपण “वाढवण” च्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मासेमारी करण्यासाठी चांगली व्यवस्था देणार आहोत. मच्छीमार बांधवाच्या बाजूने उभे राहणारे आपले सरकार आहे. कोस्टल रोड तयार करतानासुध्दा अशीच अडचण आली होती. कोळी लोकांच्या होड्या समुद्रात जाणे शक्य नव्हते. तेव्हा सुध्दा आलेल्या अडचणी आपण दूर केल्या. आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार गणेश नाईक, माजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शितपेटीचे वाटप करण्यात आले तसेच प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेतून “फिश ऑन व्हिल्स” वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या.

हे ही वाचा:

तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI…

PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version