तांत्रिक लेखापरीक्षण न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार – ठामपा आयुक्त अभिजीत बांगर

Thane Municipal Corporation। नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली जात आहे. सदर कामांचा दर्जा सर्वोत्तम असणे आवश्यक असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरिक्षण (Third Party Technical Audit) करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे

तांत्रिक लेखापरीक्षण न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार – ठामपा आयुक्त अभिजीत बांगर

Thane Municipal Corporation। नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली जात आहे. सदर कामांचा दर्जा सर्वोत्तम असणे आवश्यक असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरिक्षण (Third Party Technical Audit) करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे व या संदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तसे परिपत्रक काढून संबंधितांना निर्देश दिले आहेत.

प्रशासकीय निधीअंतर्गत होणाऱ्या रु. 3 कोटीपर्यंतच्या कामाचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण घेण्याची जबाबदारी शासनाने प्रसिद्ध केलेल्या निर्णयामध्ये नमूद केलेली आहे. मात्र शासनाने नमूद केलेल्या कामापुरते मर्यादित न राहता इतर सर्व प्रशासकीय निधीतील कामांचे महापालिकेने हाती घेतलेल्या मोठ्या कामांचे देखील त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरिक्षण करण्याचा निर्णय आयुक्त बांगर यांनी घेतला आहे. महापालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून त्यांचा दर्जा चांगला रहावा यासाठी महापालिकेने दक्ष राहणे आवश्यक आहे. मात्र पर्यवेक्षीय दुर्लक्ष किंवा अप्रमाणिक हेतू या माध्यमातून कामाचा दर्जा कमी होत असेल तर संबंधित कार्यकारी अभियंता व विभागप्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल तसेच महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या इतर कामांचे देखील त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शासनाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार ‘ब’ वर्ग महानगरपालिकांमध्ये रू.३.०० कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या सर्व कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरिक्षण (Third Party Technical Audit) करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी कार्यकारी अभियंता / विभाग प्रमुख यांच्यावर निश्चित करण्यात आली असून संबंधितांनी शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच तांत्रिक लेखापरीक्षण न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे.

शासन निर्णयानुसार ठाणे महानगरपालिकेच्या तालिकेवरील मंजूर निविदेअंतर्गत करण्यात आलेल्या त्रयस्थ तांत्रिक लेखापरिक्षण सल्लागार संस्थांमार्फत कार्यवाही करावी असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासन / केंद्र शासन / मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व अन्य शासकीय विभागांमार्फत प्राप्त होणा-या निधीअंतर्गत रू.१.०० कोटी व त्यावरील अंदाजखर्चाच्या सर्व कामांचे देयक निहाय त्रयस्थ तांत्रिक लेखापरिक्षण हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (I.I.T.Mumbai). , वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई (V.J.T.I., Mumbai) / कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, पुणे (C.O.E.P.) या संस्थांमार्फत करणेबाबतची कार्यवाही करण्याबाबत आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

तांत्रिक लेखापरिक्षण (Third Party Technical Audit) च्या माध्यमातून त्या संबंधित कामाचा दर्जा उत्तम राखण्यात मदत तर होईलच, तसेच सर्व मोठ्या कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण केल्यामुळे जो संस्थात्मक बदल होईल त्यातून कामकाजामध्ये दुर्लक्ष किंवा अप्रमाणिक हेतूने कामाचा दर्जा कमी ठेवण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा : 

मराठी विद्यार्थ्यांना मराठी कीबोर्ड ऐवजी हिंदी कीबोर्ड कशासाठी?, अतुल लोंढे

Mahavir Jayanti 2023: जाणून घ्या या शुभ प्रसंगाची तारीख, इतिहास, महत्त्व

पुन्हा एकदा देशात पसरले कोरोना नावाच्या महामारीचे सावट…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version