Sunday, July 7, 2024

Latest Posts

DOMBIVALI MIDC BLAST: आरोपींना कोठडी, ब्लास्ट उष्णतेमुळे झाल्याचा वकिलांचा युक्तिवाद

न्यायालयाने मेहता याला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात मध्यस्थी याचिका प्रियेश सिंघ यांनी दाखल केली.

डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) अमुदान कंपनीतील स्फोट प्रकरणात कंपनीचा मालक मलय मेहता याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज २५ मे रोजी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मेहता याला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात मध्यस्थी याचिका प्रियेश सिंघ यांनी दाखल केली. यावेळी त्यांच्याकडून आकाश बोईनवाड यांनी युक्तिवाद केला असून त्यांनी या युक्तिवादावर बोलताना अॅड.प्रियेश सिंघ  यांनी हा ब्लास्ट उष्णतेमुळे झाला असल्याचे सांगितले.

अमुदान कंपनीमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भयानक बॉयलर ब्लास्टमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यात ४२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर २६ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील १२ जण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना आयसीयू (ICU) मध्ये दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि अग्निशामक दलाची टीम गेल्या दोन दिवसांपासून घटनास्थळी बचावकार्य करत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना शोधून बाहेर काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. आज २५ मे रोजी सकाळीही काही मानवी अवशेष सापडले आहेत. दुसरीकडे, या दुर्घटनेत आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे का, याची खात्री नसल्याने कामगारांचे कुटुंब हताश झाले आहे. सगळे नातेवाईक रुग्णालये, शासकीय हॉस्पिटल, खाजगी हॉस्पिटल आणि पोस्टमार्टम रूममध्ये आपल्या नातेवाईकाची शोधाशोध करत आहेत. अद्यापही नातेवाईक सापडत नसल्यामुळे त्यांनी कंपनीच्या परिसरात जमा होऊन शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र पोलिस या कुटुंबियांना कंपनी परिसरातून हकलून देत असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

डोंबिवली एमआयडीसी (MIDC) स्फोट झाल्यानंतर कित्येक तास उलटले आहेत. मात्र अजूनही घटनास्थळावरून मानवी अवशेष सापडत आहेत. आज २५ मे रोजी सकाळपासून अनेक मानवी अवशेष आसपासच्या कंपनीच्या ढिगार्‍याखाली आणि काही अवशेष छतांवर पडलेले एनडीआरएफच्या जवानांना मिळाले आहेत. आज पूर्ण दिवस एनडीआरएफ (NDRF) चे जवान सर्च ऑपरेशन करणार आहेत. काल २४ मे रोजी रात्री दोन वेळेस एका कंपनीमध्ये छोट्या प्रमाणात आग लागली होती मात्र ती आग ताबडतोब अग्निशमन दलाने विझवली. त्यामुळे इथे असलेल्या सर्व कंपन्यांमधील रासायनिक द्रव्य ताबडतोब दुसरीकडे नेण्याचं काम आता सुरू करण्यात आलं आहे, जेणेकरून पुन्हा अशा घटना होऊ नयेत.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss