डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन परिसर जलमय

डोंबिवली आणि बदलापूर पाईपलाईन रोडचे काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण चे काम सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे.

डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन परिसर जलमय

डोंबिवली आणि बदलापूर पाईपलाईन रोडचे काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण चे काम सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्याची कामे वेळेमध्ये न झाले नसल्याने त्यासंदर्भातील समस्याचा सामना वाहनचालकांना पावसाळ्यात बसू लागला आहे. रस्त्यावर सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचून तळे निर्माण झाले आहे. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनांचा वेग कमी होऊन वाहन कोंडीची समस्या भेडसावत आहे. डोंबिवली अंबरनाथ महामार्गावरील खोणी म्हाडा, धामटान, नेवाळी परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे.

मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाने डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्ग हा जलमय झाला आहे. महामार्गावरील ठीक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे. एमआयडीसीच्या ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावे लागत आहे. यंदा पावसाने उशिरा आगमन केलं असलं तरी एमआयडीसीचे ठेकेदार वेळेत काम पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे आता वाहन चालकांना त्यांच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठाणे जिल्यामध्ये अर्ध्या तासाच्या पावसाने महामार्ग जलमय केल्याने अतिवृष्टीच्या कालखंडात वाहतूक कशी सुरू राहणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठेकेदारांच्या कामांवर लोकप्रतिनिधी देखील गांभीर्याने लक्ष देऊन वचक ठेवू न शकल्याने सध्या ठेकेदारांचे देखील चांगलेच फावले आहे. त्यामुळे रखडलेली गटारांची काम वेळेमध्ये पूर्ण कधी करणार? की पावसाळयामध्ये वाहनचालकांना पाण्यातूनच वाट काढावी लागणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version