डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसरात मिरवणुकीचे आयोजन

Thane : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedakar jayanti )यांची १३२ वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (Abhijeet Bnagar) यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसरात मिरवणुकीचे आयोजन

Thane : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedakar jayanti )यांची १३२ वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (Abhijeet Bnagar) यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी (Sandeep Malavi), अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे (Sanjay Herwade) उपस्थित होते. त्यानंतर, कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा चित्ररथ, लेझीम, तुतारी, दांडपट्टा, बॅण्ड आदी पथके सहभागी झाली. त्यांच्यासह ठाणे परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त प्रशांत रोडे आदी मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते.

दरम्यान, ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, ठाणे परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी (Vilas Joahi), अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी (Manish Joshi), जी. जी. गोदेपुरे, प्रशांत रोडे, शंकर पाटोळे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, आप्तकालीन दलाचे अविनाश सावंत, यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे शहरातील मुख्य शासकीय इमारती तसेच पूल, पादचारी पूल यांच्यावर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली. ठाणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, महापालिका मुख्यालय, गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, जुना आणि नवीन कळवा खाडी पूल, कोपरी, आनंदनगर येथील पादचारी पूल, वागळे इस्टेट येथील वर्तुळाकार कमान आदींवर ही रोषणाई करण्यात आली. त्यामुळे ठाणे शहराची सुंदरता आणखीन वाढली आहे.

 

हे ही वाचा : 

नवनीत राणांच्या टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर…

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version