एकनाथ शिंदे क्रिकेट संघाचा पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात दबदबा

Thane : ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर स्पोर्टींग क्लब कमिटीच्या वतीने आयोजित करण्यांत आलेल्या ३६ व्या डॉक्टर श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या अंतिम लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने विजय इंदप ॲकेडमी क्रिकेट संघाचा ८ गडी राखून पराभव करत सातव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

एकनाथ शिंदे क्रिकेट संघाचा पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात दबदबा

Thane : ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर स्पोर्टींग क्लब कमिटीच्या वतीने आयोजित करण्यांत आलेल्या ३६ व्या डॉक्टर श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या अंतिम लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने विजय इंदप ॲकेडमी क्रिकेट संघाचा ८ गडी राखून पराभव करत सातव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे एकनाथ शिंदे क्रिकेट संघाचा पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात दबदबा असल्याचे अधोरेखित झाले आहे. सेंट्रल मैदान येथे खेळविण्यात आलेल्या या टी २० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विजय इंदप ॲकेडमी क्रिकेट संघाने २० षटकात ९ फलंदाजांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. मधल्या फळीतील राहुल कश्यप याने २९ चेंडूत तडाखेबाज ३८ धावा करीत सामन्यात महत्त्वाचे योगदान दिले. एकनाथ शिंदे क्रिकेट संघाकडून विद्याधर कामत याने ३३ धावांच्या मोबदल्यात ३ गडी व सिद्धांत सिंग याने २७ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. तर अमित पांडे याने २१ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद करून त्यांना मोलाची साथ दिली. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी उपस्थित श्री सदस्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी | Time Maharashtra दरम्यान, १५५ धावांचा यशस्वी पाठलाग करताना एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने धडाकेबाज फलंदाजी करीत १९ व्या षटकातच ७ गडी राखून हा सामना जिंकला. सलामीवीर अखिल हेरवाडकर याने ३५ चेंडूत ४६ धावा केल्या व आशय सरदेसाई याने ३२ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या तर साहिल घोडे याने २४ चेंडूत ३६ धावा केल्या. शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे क्रिकेट कल्ब सलग आठव्यांदा डॉक्टर श्रीधर देशपांडे स्मृती वासंतिक क्रिकेट स्स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेला असून मागच्या वर्षीचा अपवाद वगळता सात वेळा त्यांनी अजिंक्यपद पटकावले आहे. या स्पर्धेचे विजेते पद संपादन केल्याने ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वात एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने आपल्या नावाचा दबदबा अधिकच भक्कम केला आहे. या संघातील खेळाडूंच्या यशाबद्दल व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या नियोजनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे.

हे ही वाचा : 

Breaking महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; उष्माघाताने ५ जणांचा मृत्यू आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं – उद्धव ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांचं धनादेश केला परत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version