मुंबईतील अटल पुलावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या, जाणून घ्या का उचलले हे पाऊल?

मुंबईच्या अटल सेतूवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईमधील अटल सेतु (एमटीएचएल) वरून एकाने उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

मुंबईतील अटल पुलावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या, जाणून घ्या का उचलले हे पाऊल?

मुंबईच्या अटल सेतूवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईमधील अटल सेतु (एमटीएचएल) वरून एकाने उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी २४ जुलैला दुपारी १२ वाजता ही घटना घडली आहे. अटल सेतूवरील ब्रिजवर लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. अटल सेतूवरून आत्महत्येची ही दुसरी केस आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. सायंकाळी उशिरा एका अधिकाऱ्याने त्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

करुतुरी श्रीनिवास असे या इसमाचे नाव असून तो खासगी नोकरीस असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टाटा nexon कार क्रमांक MH 05 EV 0849 ही त्याने अटल सेतूवरच ठेवली आणि स्वतःला खवळलेल्या पाण्यात झोकून दिले. तो डोंबिवली येथील रहिवासी होता. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल करत लिहिले की, “आर्थिक आणि रोजगाराशी संबंधित अडचणींमुळे ३८ वर्षीय अभियंता श्रीनिवास यांनी अटल सेतू ट्रान्स हार्बर पुलावरून उडी मारली. सरकार बेरोजगारीच्या स्थितीबाबत प्रामाणिक असेल की गुजरातमधील प्रकल्प आणि संधी थांबवणार? तू आणण्यात व्यस्त आहेस?”

 

तसेच या संदर्भात अधिकाऱ्याने सांगितले की, नवी मुंबई पोलिसांसह अटल सेतू बचाव पथक, किनारी पोलिस आणि स्थानिक मच्छिमारांनी त्याचा शोध सुरू केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, काल रात्री साडेअकरा वाजता घरातून निघालेल्या श्रीनिवासने हे पाऊल उचलण्याच्या काही तास आधी पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीशी फोनवर बोलले होते. तर श्रीनिवासच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तो गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होता. यापूर्वी त्याने २०२३ मध्ये कुवेतमध्ये काम करताना फरशी साफ करणारे पदार्थ पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मृत श्रीनिवास यांच्या पश्चात पत्नी आणि चार वर्षांची मुलगी असा परिवार आहे. श्रीनिवासचा शोध घेण्यासाठी चार मासेमारी नौका आणि सागरी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली जात आहे. मात्र, खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

MCA ELECTION : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version