spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यात H3N2 चा पहिला बळी, चिंता वाढली

मागील आठवडाभरात ठाण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्यांची संख्या तीनवर पोहचली आहे. त्याचबरोबर ‘एच ३ एन २’ (H3N2) या नवीन व्हेरियन्टचा शिरकाव झाला असून आज H3N2 विषाणूचा पहिला मृत्यू ठाण्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कमी झालेला करोनाचा संसर्ग पुन्हा डोकंवर काढतो आहे.

मागील आठवडाभरात ठाण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्यांची संख्या तीनवर पोहचली आहे. त्याचबरोबर ‘एच ३ एन २’ (H3N2) या नवीन व्हेरियन्टचा शिरकाव झाला असून आज H3N2 विषाणूचा पहिला मृत्यू ठाण्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कमी झालेला करोनाचा संसर्ग पुन्हा डोकंवर काढतो आहे. मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढत आहे. सद्या ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३०६ वर पोहचली आहे. त्यापैकी २०६ रुग्ण हे ठाणे महापालिका परिक्षेत्रातील असून कल्याण-डोंबिवली शहरात २५, नवी मुंबई शहरात २८ , उल्हासनगर शहरात ३, भिवंडी शहरात १८, मिरा-भाईंदर शहरात १० आणि ग्रामीण भागात १६ इतके सक्रीय रुग्ण आहेत.

कोरोना रुग्ण संख्येत सर्वात पुढे असणाऱ्या ठाणे शहरात गेल्या आठ दिवसांत दोन वृद्धांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर मंगळवारी आणखी एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना सहव्याथीहोत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे ‘एच ३ एन २’चा पहिला मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे. ठाणे शहरात करोना रुग्ण संख्येत वाढ होण्याबरोबरच ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने डोके वर काढले असून या आजाराचे आतापर्यंत १९ रुग्ण शहरात आढळून आलेले आहेत. यातच १ रुग्णाचा बाली गेल्यामुळे आरोग्य यंत्रांना खडबडून जाग्या झाल्या आहेत.

हे ही वाचा : 

RAJ THACKERAY SPEECH LIVE, उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका, राज ठाकरेंचा शिंदेंना कानमंत्र

जर राज ठाकरे जनतेच्या मनात मुख्यमंत्री आहेत तर मग मी जनतेच्या मनात भारताचा पंतप्रधान, जितेंद्र आव्हाड

Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss