शिवसेनेकडून मारहाण प्रकरणातील पीडित गिरीश कोळी यांचा माध्यमांशी संवाद

Thane : ठाणे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गिरीश कोळी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट शेयर केली होती. त्यात त्यांनी चैत्र नवरात्रोत्सव राजकीय आखाडा झाल्याचं म्हंटल होत. कोळी यांच्या या पोस्ट नंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) काही पदाधिकाऱ्यांनी गिरीश कोळी यांना रात्री नऊच्या सुमारास अडवून चोप दिला.

शिवसेनेकडून मारहाण प्रकरणातील पीडित गिरीश कोळी यांचा माध्यमांशी संवाद

Thane : ठाणे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गिरीश कोळी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट शेयर केली होती. त्यात त्यांनी चैत्र नवरात्रोत्सव राजकीय आखाडा झाल्याचं म्हंटल होत. कोळी यांच्या या पोस्ट नंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) काही पदाधिकाऱ्यांनी गिरीश कोळी यांना रात्री नऊच्या सुमारास अडवून चोप दिला. सोबतच गिरीश कोळी यांना मारतानाचा व्हिडिओचा चित्रित करून तो समाजमाध्यमांवर व्हायरलही करण्यात आला.

गिरीश कोळी यांनी केलेली पोस्ट ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असून वारंवार गिरीश कोळी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बोलत असतात, असं सदर व्हायरल व्हिडिओमध्ये गिरीश कोळी यांना मारहाण करणारी इसम बोल्ट आहे. ठाणे काँग्रेस पक्ष या मारहाणी विरोधात पोलिसा स्थानकात तक्रार नोंदवणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेस ठाणेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पोलीस आयुक्त जयजित सिंघ यांना या घटनेच्या निषेधार्त निवेदन देण्यात येणार आहे. पुढील २४ तासाच्या आत मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास लोकशाही पद्धतीने मारहाण करणाऱ्यांच्या घराबाहेर आंदोलन करून निदर्शने करू असा इशारा यावेळी ठाणे काँग्रेसने दिला आहे.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version