spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Badlapur घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देण्यासाठी शासन प्रयत्नशील, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालणार- CM Eknath Shinde

हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित ‘पुढारी न्यूज’ च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ‘महाराष्ट्राचा विकास व भविष्यातील महाराष्ट्राची वाटचाल’ या विषयावर प्रसन्न जोशी यांनी घेतलेल्या मुलाखत प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर (Badlapur) येथील दुर्दैवी घटना तसेच मालवण येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याच्या घटनेवरील सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत सांगितले.

याशिवाय, शेतकऱ्यांसाठी विविध योजनातून व विकास कामातून 45 हजार कोटी रुपये खर्च केले असून मुलींना उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी सारख्या अभ्यासक्रमांना शंभर टक्के फी सवलत दिली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सर्वात जास्त चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) बाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यामुळे अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. रक्षाबंधनपूर्वी बँक खात्यात आलेल्या रकमेतून आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी उपयोग होणार आहे. भविष्यात ही रक्कम 3000 पर्यंत वाढविण्यात येईल सर्वोच्च न्यायालय या गोरगरीब महिलांच्या योजना बंद करण्याचा निर्णय घेणार नाही. असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, बदलापूर (Badlapur) येथील घटनेच्या अनुषंगाने सदर आरोपीस तात्काळ अटक करत फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्यात येणार आहे. यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असून या दुर्दैवी, दुःखदायक घटनेतील नरधमास फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. आमच्या श्रद्धेचा व अस्मितेचा विषय आहे. सदर प्रकरणाच्या अनुषंगाने दोन समित्या स्थापन करण्यात येत आहेत. या घटनेची एक समिती चौकशी करेल व दुसरी समिती त्या जागी नवीन पुतळा लवकरात लवकर उभारण्याच्या कार्यवाहीसाठी काम करेल. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महाराष्ट्राच्या विकासाचा पट उघडून दाखविला. विकास कामांमुळे गुजरात व कर्नाटकपेक्षा महाराष्ट्र देशात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. मेट्रो लाईन-३ प्रकल्प सप्टेंबर मध्ये जनतेसाठी खुला केला जाईल. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक, रेल्वेचे पायाभूत सुविधा व वाहतूक प्रकल्प, बुलेट ट्रेन, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा-कोस्टल रोड या प्रकल्पांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

हे ही वाचा:

Narendra Modi यांचा महाराष्ट्र दौरा ; ‘असा’ असेल संपूर्ण दौरा जाणूयात सविस्तर

MMR प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल, CM Shinde यांची ग्वाही 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss