spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सार्वजनिक बांधकाम विभागाची ऐतिहासिक कामगिरी, पहिल्या दोन वर्षातच केली तब्बल 92 हजार कोटींची कामे: Ravindra Chavan

मागील दोन वर्षांच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात 92 हजार कोटींची विकास कामे करण्यात आली.स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच या खात्याच्या माध्यमातून विकास कामे करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली. डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायट्यांना देण्यात आलेल्या मोफत सोलर पॉवर युनिट कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या अक्षय ऊर्जा स्त्रोत योजनेचा प्रसार करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर युनिट उपलब्ध देण्याचा प्रयत्न चालवला आहे. हजारो सोसायट्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असून या माध्यमातून सोलर एनर्जीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होणार आहे. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या या उपक्रमात अनेक सोसायट्या जोडल्या गेल्या आहेत. आजपर्यंत एकूण 268 गृहसंकुल लाभार्थी झाले आहेत. यामधील 14 गृहसंकुलांना आज सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या हस्ते सोलर पॅनल वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन करताना आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावागावाचे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत आहे यामुळे या गावांना प्रथमच चांगल्या रस्त्यावरून प्रवास करणे शक्य झाले आहे. असे नमूद करतानाच स्वातंत्र्यानंतर प्रथमच दोन वर्षांच्या काळात 92 हजार कोटींची विकास कामे आपल्या खात्याच्या माध्यमातून करण्यात आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे

याबाबत बोलताना ते म्हणाले,”आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कायमच ग्रीन एनर्जीवर भर दिला आहे. त्यांच्या आवाहनानुसार डोंबिवलीतील २६८ सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सार्वजनिक विजेच्या वापरासाठी मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्यात येणार आहेत. आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील १४ सोसायट्यांमध्ये सोलार पॉवर युनिट बसवण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.मोदीजींनी राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेत डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थांना ओला आणि सुका कचरा वेगळा करता यावा यासाठी जवळजवळ ४ हजार पेक्षा जास्त डस्टबीन्स देण्यात येत आहेत.”

आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर: CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss