ठाण्यातील कोपरी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील कोपरी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाण्यातील (Thane) कोपरी पूलाचे (Kopri Bridge) लोकार्पण केलं आहे. यामुळे ठाणेकरांच्या वाहतूक कोंडीच्या अनेक समस्यांचे निवारण झालं आहे. कारण मुंबई- ठाण्याच्या वेशीवर असलेल्या या पूलावर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटकाझाली आहे. मागील चार वर्षांपासून पूलाचे काम सुरू होते. तांत्रिक अडचणी, कोरोना काळामुळे हे काम रखडले होते.

अगोदर ठाणे शहारातील कोपरी रेल्वे पुल (Kopri Bridge) हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे पुलामुळे सकाळ व संध्याकाळच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाले असून आता वाहन चालकांसाठी चार-चार पदरी मार्गिका उपलब्ध झाली. या पुलाची लांबी ७४८ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी असून हा पूल हा ५+५ पदरी मार्गिकांचा आहे.या प्रकल्पामध्ये नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गा खालून वाहानांच्या रहदारीकरीता २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.१ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्थानकाला जोडणारा वाहनांसाठी भुयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर अनेक वेळा वाहतूक कोंडी झालेली आढळली आहे. तर आता या ठाणे जिल्ह्यातील सीमा प्रश्नाचे निवारण करण्यासाठी कोपरी पूल बांधण्यात आले. ठाणे शहरातील कोपरी येथे २+२ पथ मगिकेच्या रेल्वे ओलंडणी पुलाचे ४+४ मार्गिका असे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. या पुलाची लांबी ७४८ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे. या कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामाकरीता प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर ‘सामना’च्या अग्रलेखाला काँग्रेसकडून प्रत्युत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version