spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील पायाभुत सुविधांची तपासणी

Thane : राज्यात कोविड रुग्ण वाढीचा वेग वाढलेला असताना, जिल्ह्यात कोविड-१९ (covid 19) च्या अनुषंगाने रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

Thane : राज्यात कोविड रुग्ण वाढीचा वेग वाढलेला असताना, जिल्ह्यात कोविड-१९ (covid 19) च्या अनुषंगाने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यात करोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आसल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील ग्रामीण पाच तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-१९ रुग्णांकरिता आयसोलेशन बेडसह वार्ड कार्यान्वित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांकरीता पुढील संदर्भ सेवा जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे उपलब्ध करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग सज्ज झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना संदर्भातील पायाभुत सुविधांच्या तपासणीसाठी “मॉक ड्रिल” घेण्यात आले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी नागरीकांना पुढीलप्रमाणे सुचना दिल्या आहेत.

१. ६० वर्षावरील वृध्द व सहव्याधी असलेल्या नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी शक्यता जाणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे.

२. ताप – खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असल्यास गावातील आरोग्य कर्मचा-यांसी संपर्क साधा किंवा नजीकच्या प्रा.आ.केंद्र/ ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालयमध्ये तपासणी करता जावे.

३. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नयेत.

जिल्हास्तरावर Antigen टेस्टिंग किट, ट्रिपल लेयर मास्क, N-९५ मास्क ( N95 pollution mask) व कोविड-१९ आजारा करता आवश्यक औषध साठा प्रा.आ. केंद्र / ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालयमध्ये व जिल्हास्तरावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णांचे ऑक्सिजन लेवल तपासणी करीता पल्स ऑक्सी मीटर, तापमान नोंद करीत थर्मल गन प्रा.आ. केंद्र स्तरावर पुरेशा प्रमाणात पुरवण्यात आलेले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक श्री. कैलास पवार यांनी माहिती दिली.

हे ही वाचा : 

Baba Saheb Ambedkar यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याच रजिस्ट्री

राज्यात उष्मघाताचा पहिला बळी, शेतात काम करताना मजुराचा मृत्य

राष्ट्रपतींकडून मराठमोळे तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांचा गौरव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss