जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

शरदचंद्र पवार राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे आणि आरोपामुळे चर्चेत असतात.

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

शरदचंद्र पवार राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे आणि आरोपामुळे चर्चेत असतात. अश्यातच राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आता ठाण्यात येऊर येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी झाल्याचा आरोप केला आहे.

येऊरच्या या हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. सगळ्या प्रकारचे ड्रग्ज या पार्टीमध्ये उपलब्ध होते. अनेक मोठ्या ड्रग पेडलर्सचा या पार्टीत मुक्त संचार सुरु होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “संजय गांधी नॅशनल पार्कमधून येऊरमध्ये प्रवेश करण्यात आला. हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एरिया आहे. पोलीस, वनखात्याला कारवाई करावी लागेल. प्रशासन आणि हॉटेल मालकाच साटंलोटं आहे” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “विधानसभेत मी यावर बोलणार आहे. कोणाच हॉटेल कुठे आहे? त्यांना कसं वाचवल जातय” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “सुधीर मुनंगटीवर आणि आदिवासींची संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी वन खात्याला 6 वाजता दरवाजा बंद करण्याचे आदेश दिले होते” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरु होती, असं दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. या भागात वाहतूक कोंडी मॅचमुळे नव्हे, तर रेव्ह पार्टीमुळे झाली होती. ८० टक्के लोक मुंबईतून आले होते असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

तर काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी नीट परीक्षा घोटाळ्यावरुन केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला होता. तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

हे ही वाचा

Thane शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM Shinde यांचे कारवाईचे निर्देश

Litchi Fruit Benefits: लिची तुम्हाला आवडते का? फायदे वाचून व्हाल थक्क…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version