आंतरजातीय विवाह समितीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

आंतरजातीय विवाह समितीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

आंतरजातीय आणि आंतरधर्मिय विवाह (Intercaste and interfaith marriages) करण्यापूर्वी सरकारला कळवायचे; मग, सरकार मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा करणार, असे परिपत्रक (Circular) काढण्यात आले आहे. या परिपत्रकाची चर्चा करीत असताना सदरचे परिपत्रक हे संविधान विरोधी आणि मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहे. नशीब अजून सरकार हे सांगत नाही की आम्ही कुंडल्या जमवून बघू आणि मग त्यानंतर होकार किंवा नकार कळवू. हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय? असा सवाल करीत हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहांची माहिती आधी सरकारला कळवायची; त्यानंतर सरकारी पॅनल मुलांच्या पालकांशी ( parents of children) चर्चा करेल, अशा आशयाचा एक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली.

आंतरजातीय/धर्मीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायचंय काय? कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. सरकारने हे पाऊल तातडीने मागे घ्यावं.जाती व्यवस्था म्हणजेच चातुरवर्ण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे काम चालू आहे सदरच्या परिपत्रकाची चर्चा करीत असताना सदरचे परिपत्रक हे संविधान विरोधी आणि मूलभूत अधिकारांवरती अतिक्रमण करणारे आहे. नशीब अजून सरकार हे सांगत नाही कि आम्ही कुंडल्या जमवून बघू आणि मग त्यानंतर होकार किंवा नकार कळवू. हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

राज्य सरकारतर्फे आंतरधर्मीय, आंतरजातील विवाह करणाऱ्या मुलींची; तसेच त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी समन्वय घडवून आणण्यासाठी समितीची घोषणा राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे मंगळवारी केली. महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली असून, यात एकूण १३ जणांचा यात समावेश आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर राज्य सरकारने सावध पावले उचलली आहेत. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी राज्यात अशाप्रकारची समन्वय समिती नेमण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार ही घोषणा करण्यात आली.

हे ही वाचा : 

Taaza Khabar सचिन पिळगावकरची लेक झळकणार नव्या वेब सिरीजमध्ये, वेश्येच्या भूमिकेत श्रियानं आलियालाही टाकलं मागे

India vs Bangladesh: धडाकेबाज कामगिरीने श्रेयस अय्यर ठरला भारतीय संघाला सावरणार सर्वोत्तम खेळाडू

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version