Sunday, July 7, 2024

Latest Posts

T Raja यांच्या Bhiwandi येथील सभेवरून Jitendra Awhad यांची Maharashtra Government वर टीका

जितेंद्र आव्हाड यांनीभाजप (BJP) नेते टी. राजा सिंग (T Raja Singh) यांच्या भिवंडी (Bhiwandi) येथे होत असलेल्या सभेवरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) आरसा दाखवला आहे. यावेळी त्यांनी भाजप (BJP) नेते टी. राजा सिंग (T Raja Singh) यांच्या भिवंडी (Bhiwandi) येथे होत असलेल्या सभेवरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारला जाब विचारत, “महाराष्ट्र अशांत करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचे या सरकारचे प्लॅनिंग आहे का? जर तसे नसेल तर टी. राजाला महाराष्ट्रात येऊनच का देता?” असा सवाल उपस्थित केला आहे.

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ज्याने मागच्या वर्षभर आपल्या भाषणांमधून सबंध महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून टाकले होते. तो टी. राजा लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्यासाठी भिवंडी शहरानजीकच्या पडघा येथे येतोय. महाराष्ट्र सरकारला अनेकवेळा सांगितले गेलेय की, त्याची भाषणे द्वेषाने भरलेली, अतिशय घाणेरडी असतात. त्याच्यामुळे धर्मद्वेष पसरण्याची शक्यता असते. शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्याचा विचार केला जातोय का? महाराष्ट्र अशांत करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचे या सरकारचे प्लॅनिंग आहे का? जर तसे नसेल तर टी. राजाला महाराष्ट्रात येऊनच का देता?”

पुढे आव्हाड म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, ज्याच्या भाषणाने द्वेष पसरतो; अशा माणसाला तत्काळ अटक करा, असे सांगितलेले असतानाही ठिकठिकाणी इतर धर्मियांवर टीका करून, शाब्दिक हल्ले चढवून वातावरण बिघडवण्याचे काम टी. राजाने केले आहे. महाराष्ट्र सरकारने कुठलीच कारवाई केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र सरकार केराची टोपली दाखवत आहे का? याची सगळी उत्तरं महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेला हवी आहेत.”

भिवंडी येथील पडघा परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी तेलांनागनाचे आमदार टी राजा सिंग हे प्रमुख उपस्थिती लावणार असून त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. टी राजा सिंग हे क्कतार हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर १०५ हुन अधिक गुन्हे दाखल असून १८ ते २० गुन्हे हे जातीय तेढ पसरवण्याबाबत आहेत. भिवंडी मुस्लिमबहुल भाग असल्याने टी राजा सिंग यांच्या येण्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

मविआत बिघाडी ?; मविआच्या बैठकीला Nana Patole यांची गैरहजर राहणार

Ajit Pawar यांच्यावरील संघाच्या त्या टीकेवर Rohit Pawar यांची ट्विटर पोस्ट चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss