जितेंद्र आव्हाड यांनी एक विडिओ शेअर करत महेश आहेर यांच्यावर केले गंभीर आरोप

जितेंद्र आव्हाड यांनी एक विडिओ शेअर करत महेश आहेर यांच्यावर केले गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या व्हिडिओमध्ये माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख आहे. यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही क्लिप ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) या अधिकाऱ्याची असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना मारहाण केली आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड आणि अन्य सात जणांच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर करत ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट मध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये महेश आहेर यांच्या केबिनमधील एक व्यक्ती पैसे मोजताना दिसत आहे. ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी लिहलं की, “महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सर्व जमाखर्च संभाळणारे म्हाडसे या व्हिडीओत पैसे मोजताना दिसत आहेत.” यामुळे ठाण्यात एकाच खळबळ उडाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर महेश आहार यांच्यावर हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा आव्हाड यांनी रात्री उशिरा वर्तक पोलिस ठाण्यात ठाणे महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.पण “महेश आहार यांच्या कुटुंबियांच्या जीवाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून धोका असल्याचे” महेश आहार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

महेश आहेर मारहाण प्रकरणी, जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवर गुन्हा दाखल

रोहित पवार यांचा सूचक ट्विट, सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version