spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बूस्टर डोस घेण्यासाठी KDMC आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

जास्तीत-जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी केले आहे.

देशासह राज्यभरात कोरोनाच्या जेएन-१ (JN.१) या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. कल्याण-डोंबिवलीत या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरीही या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (Kalyan DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION) आरोग्य खाते अलर्ट झाले आहे.

कोरोनासाठी महत्त्वाचा ठरलेल्या बूस्टर डोसकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. महापालिका हद्दीत आत्तापर्यंत १ लाख ७३ हजार ९३ जणांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या पाच आहे. मात्र, त्यापैकी एकही रुग्ण नव्या व्हेरियंटचा नाही. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचा (Kalyan DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION) आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. महापालिकेच्या रुख्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी दहा बेडचे आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्यात आले आहेत. तूर्तास लागण झालेल्या पाचही रुग्णांवर घरात विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सध्या महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रावरुन बूस्टर डोस (BOOSTER DOSE) दिला जात आहे. मात्र, बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक चालढकल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी केले आहे. देशभरात एका दिवसात JN.१ वेरियंटचे १०० पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत आणि आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पूर्ण देशभरात मागील २४ तासांमध्ये ५२९ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या जे एन वन (JN.१) वेरिएंटच्या रुग्णांची संख्या ११० वर पोचली असून राजधानी दिल्ली (DELHI) मध्ये कोरोनाचे नव्या वेरियंटचा (NEW VARIENT) पहिला रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या नव्या जे एन वन (JN.१) वेरियंटच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली असून यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ११० इतकी झाली आहे. बुधवारी देशात एकूण ५२९ नवीन कोरोना रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून देशांमध्ये सध्या कोरोनाचे ४०९३ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

धुळ्यात उंटांची अवैध वाहतूक, शिरपूर पोलिसांकडून ४९ उंट ताब्यात

Koffee With Karan 8 या कार्यक्रमात लावली Saif Ali Khan आणि Sharmila Tagore यांनी हजेरी, बिकिनी शूट संदर्भात उलडगे अनेक गोष्टी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss