spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धर्मवीर- २ चित्रपटातील संवादावरून केदार दिघे संतापले, म्हणाले… असं दिघे साहेब एकनाथ शिंदेंना का म्हणतील?

धर्मवीर- २ चित्रपटातील ट्रेलरमधील एका संवादावर आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रसारित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे यांचे कार्य दाखविणे शक्य नव्हते. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या ९ ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे. शनिवारी या चित्रपटाचे ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलीवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. परंतु धर्मवीर- २ चित्रपटातील ट्रेलरमधील एका संवादावर आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे.

केदार दिघे यांनी एक ट्विट करत आपले मत हे मांडले आहे. यामध्ये केदार दिघे म्हणाले आहेत की, हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन च्या टीम कडून अपमान आहे! तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार…. असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर दोन चित्रपटात टाकण्यात आला आहे. मुळात दिघे साहेबांचे हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते, मग दिघे साहेब कुणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील? आणि ते शिंदेंना का सांगतील?

धर्मवीर या चित्रपत्रात अभिनेता प्रसाद ओक यांने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे तर क्षितिज दाते यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. ‘आपल्या संघटनेचा माज आहे तो भगवा रंग ‘ या वाक्यापासून सुरू होणारा “धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासूनच आपल्याला गुंतवून ठेवतो. सर्वसामान्यांमध्ये राहणारे, सर्वसामान्यांसाठी झटणारे, भगव्यासाठी आणि हिंदुत्त्वासाठी लढणारे दिघेसाहेब पुन्हा एकदा या ट्रेलरमध्ये दिसतात. ‘तुझ्या आणि हिंदुत्त्वामध्ये मी जरी आलो, तरी मला बाजूला सारून हिंदुत्त्वाला मिठी मार’ या दिघे साहेबांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉग ने तर अंगावर काटा उभा राहतो. ट्रेलरमध्ये एकनाथ शिंदे साहेबही दिसतात. “धर्मवीर – २” चित्रपटाची टॅगलाइन ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ अशी आहे पण आता हिंदुत्वावरूनच केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे.

Latest Posts

Don't Miss