पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

बऱ्याच दिवसांपासून तरुणांमधील गुन्ह्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील तरुणीवर भररस्त्यात तरुणाने कोयता घेऊन हल्ला केल्याची बातमी समोर आली होती त्यातच आता कल्याणमधील पूर्व भागात एक तरुण पिस्तूल (pistol) घेऊन वावरताना दिसला.

पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

बऱ्याच दिवसांपासून तरुणांमधील गुन्ह्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील तरुणीवर भररस्त्यात तरुणाने कोयता घेऊन हल्ला केल्याची बातमी समोर आली होती त्यातच आता कल्याणमधील पूर्व भागात एक तरुण पिस्तूल (pistol) घेऊन वावरताना दिसला. याची माहिती पोलिसांना लागताच त्वरित कोळसेवाडी पोलिसांनी या तरुणाला अटक केले. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी जाऊन या तरुणाला अटक केली. ही घटना गुरुवारी घडली असून अटक केलेल्या या तरुणावर खून (murder), खुनाचा प्रयत्न (attempted murder) असे तब्बल पाच गुन्हे (crime)दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे .

बसवराज यादव मन्या उर्फ असं अटक झालेल्या तरुणाचं नाव आहे. आषाढी एकादशी व बकरी ईदनिमित्त कल्याण शहराच्या विविध भागातील पोलीस गुरुवारी गस्त ( patrolium) घालत होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे हे गुरुवारी कल्याण पूर्व भागात आपल्या पथकासह गस्त घालत होते. ही गस्त घालत असताना त्यांना साकेत महाविद्यालय (College)परिसरात एक तरुण हातात पिस्तूल (pistol) घेऊन फिरत आहे ,अशी माहिती मिळाली.

हरिदास बोचरे (police inspector) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बसवराज यादव मन्या उर्फ परिसरात पिस्तूल घेऊन दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला क्षणाचाही विलंब न करता लगेचच अटक केली.त्यानंतर पोलिसांद्वारे त्याची झडती (search)घेण्यात आली. या झडतीत त्याच्याजवळ पिस्तूल(pistol) आढळून आली.जरा माहिती काढल्यावर तो एक सराईत गुन्हेगार (criminal)असल्याचे समोर आले. मन्याने पिस्तूल (pistol) कुठून आणली आणि तो साकेत महाविद्यलायच्या (College)परिसरात काय करत होता ,काय करणार होता, याचा तपास पोलीस अधिकार्यांद्वारे करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

कंगनाच्या ‘Chandramukhi-2’ चित्रपटाची रिलिज डेट जाहीर, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

“माझी ड्रॅगन क्वीन” बॉयफ्रेंड अनिश जोगने वाढदिवशी शेअर केला, सई ताम्हणकरचा खास विडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version