कल्याणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

कल्याणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात गुरुवारी एका संकुलात शिरलेल्या बिबट्याला १२ तासाच्या प्रयत्नानंतर पकडण्यात वन विभाग, प्राणी मित्र संघटनांना यश आले. या बिबट्याने तीन नागरिक आणि एका वनसेवकाला जखमी केले आहे. बिबट्या हा भुकेला असल्याने आक्रमक होता, भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला पकडणे शक्य झाल्याचे प्राणी मित्रांनी सांंगितले. दरम्यान, या बिबट्याला उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे.

कल्याण पूर्वेतील नागरिकांसाठी आजचा दिवस चांगलाच दहशतीचा ठरला. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा काटेमानवली परिसरातील श्रीराम अनुग्रह इमारतीमध्ये चक्क बिबट्या शिरला. त्याआधी त्याने दोन जणांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. या बिबट्याने आधी एका व्यक्तिवर हल्ला केला, त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टीममधील प्राणी मित्रावर देखील बिबट्याने हल्ला केला. अखेर वनविभाग, पोलीस, संजय गांधी उद्यान रेस्क्यू पथक, अग्निशमन विभाग, प्राणी मित्र संघटनेच्या १० तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. तब्बल दहा तास रेस्क्यू यंत्रणेसह नागरिकांना देखील या बिबट्याने वेठीस धरलं होतं. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर कल्याणमधील नागरिकांनी देखील सुटकेचा श्वास सोडला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बचाव पथक यांना सकाळी ११ वाजता माहिती मिळाली होती की बिबट्या एका सोसायटीमध्ये अडकला आहे. आमची पूर्ण टीम सकाळी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर असं समजलं की फार अडचणींचा असा रेस्क्यू होता. इमारतीचा आराखडा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. प्रत्येक जागा ही अडचणीची जागा होती. बिबट्याला जेरबंद करण्याचे अनेक प्रयत्न केले यामध्ये आमचा एक कर्मचारी जखमी देखील झालं. अखेर सायंकाळी ५.३० च्या सुमारास बिबट्या आमच्या टार्गेटमध्ये आला आणि आम्ही त्याला पकडले. तो फार अग्रेसिव्ह असल्यानं पकडण्यात थोडा वेळ लागला. ताब्यात आल्यानंतर या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू सेंटर इथं हलविण्यात आलं आहे, अशी माहिती सहाय्यक वन संरक्षक अधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली.

हे ही वाचा : 

दीपक केसरकारांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

श्रद्धा हत्या प्रकरकणात मोठी बातमी; वेगवेगळ्या हत्यारांनं श्रद्धाच्या…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version