spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भिवंडीमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एक तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणामध्ये

भिवंडीमध्ये आगीचे सत्र काही थांबताना दिसत नाही. भिवंडीमध्ये नायगाव परिसरात पहाटेच्या वेळेस एक कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

भिवंडीमध्ये आगीचे सत्र काही थांबताना दिसत नाही. भिवंडीमध्ये नायगाव परिसरात पहाटेच्या वेळेस एक कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तीन माजली इमारतीच्या तळ मजल्यावर कपड्यांच्या दुकानामध्ये अचानक ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. अचानक भीषण आग लागल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्या ७० ते ८० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आलिया कॉम्प्लेक्स या तीन माजली इमारतीला ही आग लागली आहे. सईद कलेक्शन या कपड्याच्या दुकानात आग लागल्यानं इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दुकानामध्ये आग लागल्याने रहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. परंतु अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत या आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं.संपूर्ण दुकान आगीने भक्षस्थानी घेतलं होतं. धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात झाली. या आगीवेळी ७० ते ८० रहिवाशी इमारतीमध्ये अडकले होते त्यांना स्थानिकांच्या तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने काढण्यात आले. घरगुती सिलेंडर गॅस देखील बाहेर काढण्यात आले. या दुकानांमध्ये लागलेली आग कोणत्या कारणाने लागली हे अजूनही समजले नाही.

परंतु या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. एक तासाच्या प्रयत्नानंतर जवानांनी आग नियंत्रणामध्ये आणली आणि सध्या कुलींगचे काम सुरु आहे. वेळीच जर स्थानिक नागरीकांनी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढलं नसत तर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती. कपड्यांचे दुकान जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे.

हे ही वाचा : 

ठाण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोर्ट नाका ते ठाणे स्टेशन परिसरात मिरवणुकीचे आयोजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss