spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ambernath मध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे अमाप पाण्याची नासाडी

कल्याण बदलापूर हायवेवर (Kalyan Badlapur Highway) एमआयडीसी रोडला कृष्णा पॅलेस समोर मुख्य पाईप लाईन फुटल्यामुळे दिवसभर पाणी वाया गेले आहे.

कल्याण बदलापूर हायवेवर (Kalyan Badlapur Highway) एमआयडीसी रोडला कृष्णा पॅलेस समोर मुख्य पाईप लाईन फुटल्यामुळे दिवसभर पाणी वाया गेले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार ही पाईपलाईन सकाळी नऊच्या सुमारास फुटली असून दिवसभर या पाईपलाईनवर कोणीही लक्ष न दिल्यामुळे अमाप प्रमाणात पाणी वाया गेले आहे. दिवसभर अमाप प्रमाणात पाणी वाया जाऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारची दखल नगरपालिकेच्या सदस्याने घेतली नसल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार दहा तासाहून अधिक तास झाले असूनही अंबरनाथ नगरपालिकेने (Ambernath Municipality) कोणतीही दखल घेतलेली नाही. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवत असताना पावसाळ्यात अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मुख्य महामार्गावर असूनही कोणत्याही नागरिकाने या बाबतीत कोणतीही दखल घेतली नाही. मान्सूनचे आगमन अजून ठाणे जिल्यामध्ये झाले नाही.

काही दिवसांपूर्वीच पाण्याची टंचाई अंबरनाथमध्ये दिसून आली अशी अमाप प्रमाणामध्ये पाण्याची नासाडी होत आहे. तर दुसरीकडे पाण्याची टंचाई अंबरनाथमध्ये उद्भवत आहे. या घटनेची अंबरनाथ नगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हे ही वाचा:

आदिपुरुष चित्रपट बदलण्यात येणार, निर्माते आणि दिग्दर्शकाचा निर्णय

Ashadhi Ekadashi 2023, पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांचं वेळापत्रक जाहीर

वादळाचा फटका बसला हॉटेलला; पाऊस वारा पाहून उडाली लोकांची धांदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss