जैन मंदिराच्या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दाखल

जैन मंदिराच्या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दाखल

आज जैन समाजाकडून ठाण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जैन समाजाकडून आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते. हे आमंत्रण स्वीकारत ठाण्यातील जैन समाजाच्या मंदिरातील कार्यक्रमासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ठाण्यामध्ये (Thane) दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्यात महाराष्ट्र सैनिकांकडून ठाण्यामध्ये काढण्यात आली आहे. ही बाईक रॅली बाईक रॅली ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावरून काढण्यात येणार आहे.

ठाणे (Thane) येथील टेंभीनाका (Tembhi Naka) परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे आनंदाश्रम हे कार्यालय असून येथून सध्या बा‌ळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कामकाज चालते. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून टेंभीनाका (Tembhi Naka) परिसराची ओळख आहे. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहत असून या समाजाचे टेंभीनाका परिसरात मंदीर आहे. आणि आज टेंभीनाका (Tembhi Naka) भागातील या जैन मंदिरामध्ये जैन समाजातील देवांची प्राणप्रतिष्ठान केली जाणार आहे. यासाठी मंदिरातर्फे आणि जैन समाजातर्फे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भव्य कार्यक्रमासाठी जैन समाजाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आमंत्रित रण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) हे या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सकाळी ९ :३० वाजता ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळेस राज ठाकरे हे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांचा हा महिनाभरातील दुसरा ठाणे दौरा असून आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानला जात आहेत.

हे ही वाचा:

पाणी गरम करण्यासाठी गीझर वापरताय? तर नक्की वाचा

Union Budget 2023, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरु होऊन ‘या’ दिवशी होईल सादर

राशी भविष्य २१ जानेवारी २०२३ आपण हाती घेतलेलं कोणतेही काम पूर्णत्वास..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version