Monsoon Updates: Navi Mumbai मध्ये मुसळधार पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी साचले पाणी

Monsoon Updates: Navi Mumbai मध्ये मुसळधार पावसाचे थैमान, अनेक ठिकाणी साचले पाणी

रात्रभर पडणारी पावसाची संततधार आणि सकाळी वाढलेला पावसाचा जोर, यामुळे नवी मुंबईत पुन्हा अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले असून तुर्भे येथील एका कॉलनीत पाणी शिरले आहे. याठिकाणी लहान मुलांनी स्विमिंग पूल बनवून पोहण्याचा आनंद लुटला. मात्र पाऊस असाच पडत राहिला तर अनेक ठिकाणी पाणी भरून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नाले सफाईचा दावा याठिकाणी पूर्णपणे फोल ठरल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत जेव्हा मध्यम मुसळधार पाऊस पडला त्यावेळी पाणी भरल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे पालिकेने लाखो रुपये खर्च करून आणि पालिका आयुक्त स्वतः पाहणी करून नक्की नाले सफाई झाली की हात सफाई झाला असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. एयरपोर्ट कॉलनी, कलिना कुर्ला रोड जवळ पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. परळ एलफिस्टन ब्रिज जवळ पावसामुळे वॉटर लॉगिंग झाले आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफजिल्हा प्रशासनपोलीसमहापालिकानगरपालिका सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावीअशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

सर्व प्रशासनाने सतर्क राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावेनागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारेतलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावात्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे)माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्यऔषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा:

DHARMVEER 2 TRAILER LAUNCH च्या वेळी DEVENDRA FADNAVIS यांनी केल्या भावना व्यक्त..

“तुमच्या निवडणुका आणि पाडणं ही प्रायोरिटी आहे का?” PRAVIN DAREKARA यांनी जरांगेंना विचारला प्रश्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version