spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रावर अन्याय होईल तेव्हा MVA गप्प बसणार नाही, Kedar Dighe यांचा विरोधकांना इशारा

यापुढील सर्व आंदोलनं ही रस्त्यावर होतील हे लोकांच्या मानसिकतेने दिसून येत असल्याचे मत केदार दिघे यांनी व्यक्त केले आहे.  राजकोट (Rajkot) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज १ सप्टेंबर रोजी “जोडे मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडले. याबाबत केदार दिघे यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले केदार दिघे? 

यापुढची आंदोलनं मोठ्या स्वरूपात होताना दिसतील. जो काय अन्याय, अत्याचार या महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्या विरोधात सर्वसामान्य जनता किंवा महाविकास आघाडी यांनी तोंड उघडायचं नाही. सरकार जे चालवतात तेच योग्य आहे, एवढेच धरून चालायचं हे अतिशय अन्यायकारक आहे. यापुढील सर्व आंदोलन ही रस्त्यावर होतील हे लोकांच्या मानसिकतेने दिसून येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराजांची आणि महाराष्ट्राची माफी मागायला उशीर केला, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केले. जे अधिकारी, जे मंत्री या सर्व प्रक्रियेमध्ये होते त्यांनी पूर्णतः अभ्यास देखील केला नाही. शिवाजी महाराजांचा 28 फुटाचा पुतळा उभा करतो, त्यावेळेस त्याचा अभ्यास होणं गरजेचे आहे, तो झाला नाही. ज्याच्याकडे हा पुतळा उभारण्याची आणि बनवण्याची जबाबदारी होती त्याला निव्वळ दोन आणि अडीच फुटाच्या मुर्त्या बनवण्याचा अनुभव आहे. त्या माणसाला तुम्ही अशा मोठ्या मूर्ती बनवण्यासाठी देऊन भ्रष्टाचार केला असा आरोप शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होईल तेव्हा महाविकास आघाडी तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दिला.

आज हुतात्मा चौक (Hutatma Chowk) ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती मात्र तरीही मविआकडून हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय मविआच्या आंदोलनाला महायुतीने आंदोलनातूनच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिल्याचे चित्र आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेत्यांचा होता. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss