spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Naresh Mhaske यांचा आमदार Sanjay kelkar यांना सल्ला!

या सर्व प्रकरणावर प्रताप सरनाईक यांनी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे वक्त्यव्य केले आहे. तसेच सन २०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते.

रविवारी ११ जून रोजी भाजपच्या वतीने ठाण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि कल्याण ही शहरे भाजपची असल्याचा दावा केला होता. संजय केळकरांच्या याच वक्तव्यावर आता विविध पडसाद उमटत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. तसेच शिवसेना असेल किंवा भाजपचे असतील त्यानुसार ज्येष्ठ नेते जेव्हा निर्णय घेतात, तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतील नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला हव्यात आणि त्या मर्यादा सांभाळून बोलायला हवे, असा सल्ला नरेश म्हस्के यांनी आमदार संजय केळकर यांना दिला.

नरेश म्हस्के यांनी ‘आपले मुख्यमंत्री असताना टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात काय केले? याचे उत्तर द्यावे, असा टोला चव्हाण यांचे नाव न घेता लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या १० महिन्यांपासून केलेली कामे आणि आलेली सत्ता या गोष्टी बहुतेक केळकर यांना पटलेल्या दिसत नाहीत, त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून नेहमी हे दिसून येत असल्याचेही नरेश म्हस्के म्हणाले. परंतु, केळकर यांचे बोलणे फारसे गांभीर्याने घेणे योग्य नसल्याचे देखील ते म्हणाले.

या सर्व प्रकरणावर प्रताप सरनाईक यांनी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे वक्त्यव्य केले आहे. तसेच सन २०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा सेना – भाजप युतीचे मिळून ४२ खासदार राज्यातून लोकसभेत गेले होते. त्यामुळे यावर भाष्य करणे उचित होणार नसल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

डेलीहंट, वनइंडिया आणि दिल्ली पोलिस नागरिकांना सक्षम करण्यासाठी सहयोग

भाजपकडून निवडणुकांच्या रिंगणात कोण उतरणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss