Thursday, July 4, 2024

Latest Posts

विकसित भारताचं स्वप्न NDA सरकार नक्की एकत्र पूर्ण करणार, Naresh Mhaske यांची ग्वाही

माझ्यापरीने या एन.डी.ए. सरकारला भारताच्या विकासात जी होऊ शकेल ती मदत मी नक्की करीन. विकसित भारताचं स्वप्न एनडीए सरकार नक्की एकत्र पूर्ण करणार!

२५ जून म्हणजेच आज संसद भवन येथील नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळ्याचा (Loksabha MP Oath Ceremony) दुसरा दिवस पार पडत आहे. आज २५ जून रोजी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde), शिरूर मतदारसंघाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe), बारामतीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule), चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar), भिवंडी मतदारसंघाचे सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre), सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), अमरावतीचे बळवंत वानखेडे (Balwant Wankhede), तसेच अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शपथ घेतली. याबाबत नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मी नरेश गणपत म्हस्के, लोकसभेचा सदस्य ठाणे मतदारसंघाचा खासदार म्हणून आज १८ व्या लोकसभेत शपथ घेतली. ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत पाठवलं आहे. आणि आज ती जबाबदारी मी अधिकृत रित्या स्वीकारली आहे. हा खरंतर लोकशाहीचा विजय आहे. माझ्यासारखा एका सामान्य घरातला एक मुलगा योगायोगाने समाजकारणासाठी एका राजकीय पक्षाचं कार्य करू लागतो, आणि त्याच्या कामाचा सन्मान म्हणून लोक त्याला खासदार म्हणून निवडून आणतात…हे फक्त भारतातच घडू शकतं. ठाण्याच्या विकासासाठी अनेक गोष्टी डोक्यात आहेत, ठाण्यातील लोकांनी अनेक गोष्टी सुचवल्या आहेत, या सगळ्याचा विचार सुरू आहे. आपल्या ठाण्याला विकासपथावर पुढे नेण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन याची खात्री ठाणेकरांना देतो. माझ्यापरीने या एन.डी.ए. सरकारला भारताच्या विकासात जी होऊ शकेल ती मदत मी नक्की करीन. विकसित भारताचं स्वप्न एनडीए सरकार नक्की एकत्र पूर्ण करणार! जय हिंद! असा शब्दांत नरेश म्हस्के यांनी त्यांचे मत मांडले. 

“मी डॉ. श्रीकांत लता एकनाथ शिंदे” आज लोकसभेचा सदस्य निवडून आलो असल्याने विधिद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा आणि निष्ठा बाळगीन आणि भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करेन, अशी शपथ आज लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद भवनात श्रीकांत शिंदे यांनी घेतली. माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर आणि मतदारसंघात गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांवर विश्वास दाखवल्याने सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यावेळी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जन सामान्यांच्या न्याय हक्कासाठी अविरत काम करण्याचा संकल्पही केला असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा

महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांच्या सुटची मागणी करणाऱ्या Kangna Ranaut यांना Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

Ujjwal Nikam यांना BJP ने Loksabha Election साठी फासावर लटकवण्याचं काम केलं: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss