spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही घातलं नाही तरी छान दिसतात, रामदेव बाबांच्या या विधानावर रुपाली ठोंबरे संतप्त

पतंजलीच्या महिला महासंमेलनाला योगगुरू रामदेवबाबांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त विधान रामदेव बाबा यांनी केलं. रामदेव बाबांच्या या वक्तव्याने राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे यावेळी मंचावर अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं. तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंही उपस्थित होते.

हेही वाचा : 

IND vs NZ 1st ODI : पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा केला पराभव

रामदेव बाबांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे प्रचंड संतापल्या आहेत.,रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली. पुढे रुपाली ठोंबरे म्हणाल्या, महिलांनी काय घालायाचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठिक आहे. ते मान्य आहे. पण पुढचं विधान कितपत योग्य आहे? रामदेव बाबा डोकं खाली आणि पाय वर करा. तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Virat Kohli and Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे पाहा अलिबागच्या बंगल्याचे खास फोटो

रामदेव बाबा नेमकं काय म्हणाले?

रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांनंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा म्हणाले.

Uddhav Thackeray : चिखलीतील उद्धव ठाकरेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात

Latest Posts

Don't Miss