आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरून डोंबिवली-कल्याणमधील रस्त्यावरील खड्ड्यांचे काम सूरू…

कल्याण- पालिका (Kalyan- Municipality) हद्दीतील खड्डे भरणीची कामे येत्या तीन दिवसात रात्रंदिवस काम करुन पूर्ण करावीत.

आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरून डोंबिवली-कल्याणमधील रस्त्यावरील खड्ड्यांचे काम सूरू…

कल्याण- पालिका (Kalyan- Municipality) हद्दीतील खड्डे भरणीची कामे येत्या तीन दिवसात रात्रंदिवस काम करुन पूर्ण करावीत. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (Dr. Bhausaheb Dangde) यांनी दिला आहे. कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) पालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांनी गिळून टाकले आहेत. या रस्त्यांवरुन वाहने चालविताना चालकांना कसरत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. मागील २५ दिवसाच्या कालावधीत पावसाने उघडिप देऊनही पालिकेने खड्डे न भरल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. आता गणेशोत्सव (Ganeshotsav) आला तरी खड्डे भरणीची कामे युध्दपातळीवर सुरू नसल्याने ही कामे पूर्ण होणार कधी, असे प्रश्न गणेशभक्तांकडून उपस्थित केले जात आहेत.

आयुक्त डॉ. दांगडे यांनी खड्डे भरणीची कामे तातडीने भरण्याचे आदेश सोमवारी सकाळी दिले. शहर अभियंता अर्जुन अहिरे (Engineer Arjun Ahire) यांनी पालिका हद्दीतील खड्डे भरणी करणाऱ्या सर्व ठेकेदारांना तातडीने आहे त्या सामग्रीमध्ये खड्डे भरणीची कामे करण्याचे आदेश दिले. खड्डे भरणीची कामे सुरू झाले आहेत की नाहीत. ही कामे योग्यरितीने केली जात आहेत की नाहीत याची पाहणी करण्यासाठी आयुक्त दांगडे यांनी सोमवारी रात्री शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या खड्डे भरणीच्या कामाची पाहणी केली.

येत्या तीन दिवसाच्या काळात रात्रंदिवस काम करुन खड्डे भरणीची कामे पूर्ण करा. गणपत्ती बाप्पांचे आगमन सुकर झाले पाहिजे. नागरिकांना सुस्थितीत प्रवास करता आला पाहिजे. अशा पध्दतीने काम करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकारी, ठेकेदारांना दिले. रस्ते पाहणीनंतर आयुक्तांनी कल्याण मधील दुर्गाडी गणेश घाट येथील गणपती बाप्पा विसर्जन स्थळाच्या नियोजनाची पाहणी केली. गणेशघाटावर खाडी किनारी पालिकेकडून गणपती विसर्जनाची तयारी केली जात आहे. खाडी किनारी गर्दी होणार नाही यादृष्टीने डोंबिवलीतही नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, माहिती विभागप्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, उप अभियंता शाम सोनावणे उपस्थित होते.

हे ही वाचा: 

जरांगे पाटलांकडून अखेर सरकारला एक महिन्याचा वेळ

धडाकेबाज संजीव जयस्वाल तणावाखाली, पात्र भाडेकरूंची घरांसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version