कल्याण स्थानकात धावती एक्स्प्रेस पकडताना एकाच मृत्यू, एक प्रवासी गंभीर जखमी

धावत्या एक्सप्रेसमध्ये चढत असताना काहीवेळा प्रवाशांचे पाय घसरतात. त्यामध्ये काही वेळा प्रवाशांचा मृत्यू देखील झाला आहे.

कल्याण स्थानकात धावती एक्स्प्रेस पकडताना एकाच मृत्यू, एक प्रवासी गंभीर जखमी

धावत्या एक्सप्रेसमध्ये चढत असताना काहीवेळा प्रवाशांचे पाय घसरतात. त्यामध्ये काही वेळा प्रवाशांचा मृत्यू देखील झाला आहे. असाच अपघात कल्याण रेल्वे स्थानकांत डेक्कन एक्सप्रेस पकडत असताना दोन प्रवाशांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला असून एक प्रवासी जखमी झाला आहे. स्टेशनवरील हमालांनी जखमीला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

डेक्कन क्वीन ही एक्सप्रेस कल्याण स्थानकात थांबत नाही. पण या स्थानकांवर येताच तिचा वेग थोडा कमी होतो. पण धावती एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न करत असताना दोन प्रवाशांचा अपघात झाला आहे. घटनास्थळी आर पी एफ, जी आर पी जवान दाखल झाले. ही घटना घडल्यानंतर लगेच रेल्वे पोलीस घटना स्थळी पोचले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version