spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अंबरनाथमध्ये स्लॅबचा भाग कोसळून एक जण जखमी

अंबरनाथमधील नवरे नगर परिसरामध्ये गोवर्धन या इमारतीच्या तळमजल्यातील एका सदनिकेतील स्लॅबचा काही भाग सोमवारी दुपारी अचानक कोसळला होता.

Ambernath News – अंबरनाथमधील नवरे नगर परिसरामध्ये गोवर्धन या इमारतीच्या तळमजल्यातील एका सदनिकेतील स्लॅबचा काही भाग सोमवारी दुपारी अचानक कोसळला होता. या घटनेमुळे घरामधील एक रहिवासी किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु नगरपालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या धोकादायक इमारतीच्या यादीमध्ये नसतानाही स्लॅब कोसळल्याने या गृहसंकुलातील राहिवाशींचाही जीव टांगणीला लागला आहे. अंबरनाथ नगरपालिकेने नुकतीच शहरातील ३१० धोकादायक आणि १३ अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर केली आहे.

धोकादायक इमारतींच्या संदर्भामध्ये पालिका योग्य त्या उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेत असतानाच सोमवारी अंबरनाथ पूर्वेतील नवरेनगर भागामधील गोवर्धन इमारतीमधील भरत बेरडे यांच्या घरामधील स्लॅबचे काँक्रीट अचानक त्यांच्या अंगावर कोसळले. या घटनेत ते किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना बाहेर काढले. पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्याचे पथक उशिरा इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते.

अंबरनाथमधील नवरे नगर परिसरामध्ये अनेक १५ ते २० वर्ष जुन्या इमारती आहेत. त्याचबरोबर गोवर्धन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत यासंदर्भातील माहिती नगर रचनाकार विवेक गौतम यांनी दिली आहे. अहवाल आल्यानंतर या इमारती संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेण्यात आला आहे असेही नगर रचनाकार विवेक गौतम यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर गोवर्धन इमारतीने एक पत्र अंबरनाथ नगरपालिकेला लिहिले आहे.

हे ही वाचा:

Ashadhi Wari 2023, मुक्ताबाईंच्या पालखीचा विसावा वाकवड येथे तर धंदेवाडीत नाथांच्या पालखीचे उभे रिंगण

Mumbai Police यांच्याकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, खोके दिन, गद्दार दिन साजरा…

Ashadhi Ekadashi 2023, आजपासून निघणार आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss