Raj Thackeray स्वत:चं एक नाटक कंपनी – Jitendra Awhad

Raj Thackeray स्वत:चं एक नाटक कंपनी – Jitendra Awhad

शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी शेवटच्या टप्प्यात दाखवले आहे. अख्खे घर तुटले अजित पवार एकीकडे, सुप्रिया सुळे एकीकडे आणि शरद पवार एकीकडे गेले. शरद पवार यांनी हे नाही पाहिले की त्यांचे घर तुटते आहे, त्यांनी सांगितले मी जातीवादी शक्तींसोबत जाणार नाही. रोज सकाळी ७ माणसे त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि बोलायचे भाजपात जाऊ. त्यांनी कधीच होकार दिला नाही पण त्यांनी असा नकार दिला की ते इतिहासात नमूद होईल. शरद पवार यांनी आपले घर कोसळताना पाहिले पण आपली विचारधारा सोडली नाही, असे मत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार असे दोघांचेही नगरसेवक राज ठाकरेंना एकत्र भेटायला आले होते त्यावेळचा किस्सा उपस्थितांना सांगितला. ते सगळे आतून एकच असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी यावेळी केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. वर्षभरात ५० वेळा राज ठाकरे सीएमकडे चहा प्यायले आहेत. त्यामुळे त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. राज ठाकरे स्वत:चं एक नाटक कंपनी आणि मिमिक्री आर्टीस्ट आहेत ते कोणाचीही नक्कल करु शकतात. दुसऱ्याच्या पक्षात काय सुरु आहे  हे ते कशाला बघत आहेत? आम्ही खुलेआम सांगत आहोत आमच्यातून गेलेल्या कोणासाठीही आम्ही दरवाजा उघडणार नाही, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

पोलिस आणि सगळे त्यांच्या ताब्यात आहे पण लोकांची मते ही लोकांच्याच ताब्यात आहेत ना? गद्दारांना मते द्यायची नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवले आहे. अशी दमदाटी करत सुटलात तर लोकं चिडतील. असे राजकारण कधी आम्हाला पाहिले नसल्याची खंत जितेंद्र आव्हाड यांनी आमदार सुनील शेळके यांच्याबाबत व्यक्त केली.

हे ही वाचा:

MNS Raj Thackeray Live: राजकारणात टिकायचं असेल तर संयम महत्वाचा

महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू – Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version