spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

तलावाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. आज रामनवमीनिमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

तलावाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. आज रामनवमीनिमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. दरम्यान कीर्तनाच्या माध्यमातून प्रभोधनासोबतच प्रभू श्री रामाचा पाळणा झुलवत यावेळी राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला आहे. दरम्यान टाईम महाराष्ट्रने या ऐतिहासिक मंदिराचे विश्वस्त प्रशांत हजारे यांच्या सोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे. शिलाधर राजानें दहाव्या शतकात येथे तीनशे वर्षे राज्य केले व त्याची राजधानी म्हणजे आपले ठाणे असं सांगितलं. मंदिराच्या इतिहासाबाबत हजारे यांना विचारे असता मंदिराच्या निर्मितीच्या इतिहास त्यांनी टाईम महाराष्ट्राला सांगितलं आहे. शिलाधर राजाने तयार केलेल्या बावीस तलावांपैकी पाच प्रमुख तलाव ठाण्यात आहेत, ते म्हणजे मासुंदा तलाव , अंबेघोसाळे तलाव, मखमली तलाव,उथळसर तलाव, आणि सिद्धेश्वर तलाव. इतिहासाचा मागोवा घेतला असता असे निदर्शनास येते की ११६२ साली या तलावाचे क्षेत्रफळ अंदाजे १०५ एकर इतके होते. १९९६ साली ते २० एकर इतके तर आज फक्त २ एकरच्या आसपास उरले आहे. याच सिद्धेश्वर तलावाजवळ मंदिर असल्याच्या खुणा सापडतात . त्यापकीच एक म्हणजे ही ब्रह्मदेवाची पूर्ण मूर्ती. सदर मूर्ती ही मे १९९५ साली तलावाचे साफसफाईचे काम सुरू असताना सापडली. सदर मूर्ती ही पाच फूट उंचीची असून चार मुखी आहे. ही मूर्ती हिरव्या दगडात कोरलेली असून वास्तू शिल्पाचा एक अप्रतिम असा नमुना आहे. तसेच हिंदू देवंतांच्या संपन्नतेची साक्ष देणारी आहे. यातील कलाकुसर अप्रतिम आहे.

ब्रम्हा हा सृष्टीचा निर्माता असल्याकारणाने तो प्रौढत्वाकडे झुकलेला आहे.त्याची दाढीधारी चार मुखे असून ती चार दिशाना आहेत. ती धीरगंभीर परंतु प्रसन्न मुद्रेत आहेत. ब्रम्हदेव समपद आसनात पाठशिलेवर उभा असून ,त्याच्या पायाजवळ दोन्ही पत्नी म्हणजे सरस्वती व गायत्री हंसावर उभ्या आहेत. सदर मूर्ती मकर तोरणात असून मस्तकामागे प्रभामंडल व कीर्तीमुख दिसून येते मस्तकावर किरीटमुकुट ,अंगावर यज्ञोपवीत असून दंडावर बाजूबंद, हातावर अधोवस्त्र , कंबरेला मेखला आदी आभूषणाने सजलेली आहे. दोन्ही हातात कमंडलू व दोन हातात वेद आहेत. या मूर्तीवर चालुक्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. हि सगळी माहिती टाईम महाराष्ट्राला मंडळाचे विश्वस्त प्रशांत हजारे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss