Ambernath West परिसरात रस्ते जलमय

सध्या ठाणे (Thane) जिल्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे.

Ambernath West परिसरात रस्ते जलमय

सध्या ठाणे (Thane) जिल्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. ठाणे जिल्यामधील अंबरनाथ शहरामध्ये रस्ता जलमय झाला आहे. अंबरनाथ पश्चिम (Ambernath West) परिसरामध्ये पावसाने जोर पकडला आहे आणि त्यामुळे आता अंबरनाथ पश्चिमचा परिसर हा जलमय झाला आहे. अंबरनाथ तालुक्यामध्ये मागील २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये अंबरनाथ पश्चिम परिसरामध्ये हिची परिसर असते आणि जागोजागी रस्ते तुडुंब भरलेले असतात.

बऱ्याच वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असूनही अंबरनाथ शहराची ही परिस्थिती आहे. अंबरनाथ पश्चिम परिसरामध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांचे देखील हाल होत आहेत. स्थानिक नागरिकांना या समस्येला वर्षानुवर्षे तोंड द्यावे लागत आहे. पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्यामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट केला आहे.

 

ठाणेमध्ये जिल्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने भरले आहेत. त्याचबरोबर भिवंडीमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरले होते त्यामुळे त्या दुकानांचे मालक तर होतेच परंतु ग्राहक सुद्धा दुकानांमध्ये अडकले आहेत. रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्यामुळे वाहनसेवा विस्कळीत झाली आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी तुंबले देखील आहे. महाराष्ट्र सरकार यावर काही उपाय करणार की दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील असाच रस्त्यांवरचे पाणी साचत राहणार आहे. यावर सरकारने त्याचबरोबर अंबरनाथ नगरपालिकेने लक्ष्य घालावे अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे.

हे ही वाचा:

‘काळे झेंडे दाखवण्याचा धंदा आमचा, ते आमच्याकडून शिका’ असे विधान करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना खडेबोल सुनावले

Air India – एअर इंडियाच्या विमानात आणखीन एक घाणेरडा प्रकार, प्रवाशाने सर्वांसमोर केलं…

पुण्यामध्ये हल्ला झालेल्या घटनेवरून अजित पवार संतापले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version