सह्याद्री प्रतिष्ठाने साजरा केला २८६ ठाणे मुक्ती दिन

आजच्याच दिवशी २७ मार्च १७३७ (सत्तावीस मार्च सतराशे सदतीस) रोजी मराठी सनेने ठाणे पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून केले होते. यानंतर पोर्तुगीजांच्या तावडीतून ठाणे मुक्त झाले होते.

सह्याद्री प्रतिष्ठाने साजरा केला २८६ ठाणे मुक्ती दिन

मोरया गोसावी यांनी अनुग्रहित केलेले भिवंडी जवळील अणजुरकर नाईकांच्या विनंतीला मान देऊन चिमाजी अप्पा पेशवे यांनी ठाण्यातील पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम उघडली होती. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली बिवलकर, नाईक, बलकवडे, मानकर, ढमढरे असे रांगडे वीर पोर्तुगीजांच्या ठाण्यावर चालून आले होते. आजच्याच दिवशी २७ मार्च १७३७ (सत्तावीस मार्च सतराशे सदतीस) रोजी मराठी सनेने ठाणे पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून केले होते. यानंतर पोर्तुगीजांच्या तावडीतून ठाणे मुक्त झाले होते.

याच इतिहासाची जाणीव येणाऱ्या पिढीला व्हावी याच उद्देशाने सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील १० वर्षांपासून प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये “ठाणे मुक्ती दिन” साजरा करण्यात येतो. मुक्ती दिन संग्रामाच्या खुणा आजत्यागत ठाण्यात अस्तित्वात आहेत.

आजही सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेंट्रल जेलच्या परिसरात “ठाणे मुक्ती दिन” साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे सेंट्रल जेलचे अधीक्षक अहिरराव उपस्थित होते. या कार्यक्रमाला सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, अनिकेत कडव, सुदेश पाटील, राजेश जाधव, संतोष साळुंखे, संतोष साळवी, विशाल वाघ, निलेश कोळी, सचिन मोते, उपस्थित होते.

हे ही वाचा : 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन अजित पवार सरकारवर संतापले

काँग्रेसने रणशिंग फुंकले, कर्नाटकमध्ये १२४ उमेदवारांची यादी जाहीर

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version