शिंदेंच्या बालेकिल्ल्याला लागणार सुरुंग? ठाकरे गटाच्या “मिशन ठाणे” ला सुरुवात

शिंदेंच्या बालेकिल्ल्याला लागणार सुरुंग? ठाकरे गटाच्या “मिशन ठाणे” ला सुरुवात

शिवसेना दुभंगल्यानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शर्तीचे प्रयत्न आहेत. अनेक नवीन गोष्टींच्या माध्यमांतून ते शिवसेनेला पुन्हा पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यातीलच एक प्रयत्न म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ठाणे’ हे नवं धोरण हाती घेतलं आहे. या ‘मिशन ठाणे’ अंतर्गत ठाण्यातील शिवसेना कार्यकारिणीवर ठाण्यातील संघटकांपासून ते उपविभाग प्रमुखपदी अनेकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्यांमध्ये जुन्या चेहऱ्यांसोबत सोबतच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं मनावर घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याला ठसळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या केल्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या अख्यारीतील वृत्तपत्रातून ठाण्यातील या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची पानभर यादीच सामनामधून जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना अधिक महत्त्व दिल जात आहे. महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्याचं म्हटलं जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेला बंड आणि त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतर या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला पुन्हा बळ देण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाने संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ठाण्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये सहसमन्वयक, उपविभागप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, विभागप्रमुख, विधानसभा क्षेत्र सचिव आदी पदांसाठी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

याशिवाय महिला आघाडी आणि युवती सेनेच्याही पदांवरही नियुक्त्या करण्यात येणार आहेत. महिला आघाडी शहर संघटक, महिला आघाडी उपजिल्हा संघटक, उपशहर संघटक, विभाग समन्वयक, विभाग संघटक, उपशाखा संघटक इत्यादी पदांसाठी देखील नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर युवती सेना उपशाखा अधिकारी, विधानसभा क्षेत्र संघटनक, विभाग संघटक, शाखा संघटक, विभाग संघटक आदी या पदांवर देखील नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच युवासेना ठाणे जिल्हा समन्वयकपदी अॅड. दीपक गायकवाड (ओवळा-माजिवाडा विधानसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

उर्फी थांबवणार तिचा नंगानाच? उर्फी जावेदला पोलिसांकडून नोटीस

मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी ठाम, १२ तासांहून अधिक काळ लोटला तरी आंदोलन सुरूच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version