Virar मधील धक्कादायक बातमी, Shivsena UBT ठाण्याचे उपशहर प्रमुख Milind More यांचे निधन, हल्लेखोर पसार

Virar मधील धक्कादायक बातमी, Shivsena UBT ठाण्याचे उपशहर प्रमुख Milind More यांचे निधन, हल्लेखोर पसार

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे (Milind More) यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. विरारच्या सेवन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी त्यांचे निधन झाले. मिलिंद मोरे यांच्या मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. मात्र त्यांना जमावाने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिलिंद मोरे हे त्यांच्या कुटुंबासोबत विरारच्या अर्नाळा या ठिकाणी असलेल्या सेवन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी गेले होते. त्यावेळी एका रिक्षा चालकाने त्यांच्या पुतण्याला धक्का दिला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर रिक्षा चालकाने गावात जाऊन ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली आणि रिक्षा चालक आपल्या साथीदारांना घेऊन रिसॉर्ट जवळ आला. या घटनेनंतर मिलिंद मोरे आणि त्यांच्या पुतण्यावर रिक्षा चालक आणि गावकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी दोघांनाही मारहाण केली आणि या मारहाणीत घाव बसल्याने मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिलिंद मोरे अचानक कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर गावकरी आणि रिक्षाचालक पसार झाले आहे.

मिलिंद मोरे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला की हार्ट अटॅकने याची कोणतीही माहिती अजूनही समोर आली नाही. पण पोस्टपार्टम अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या प्रकरणाबाबत अर्नाळा पोलिसांनी रिक्षा चालकासह हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मिलिंद मोरे यांच्या मृत्यूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पोलिसांची चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे वसई तालुका प्रमुखांकडून देण्यात आली. मिलिंद मोरे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी २९ जुलै रोजी ठाण्यातील जवाहर बाग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

Womens Asia Cup 2024: आशिया कपमधील भारतीय महिला संघाचे स्थान ठरणार अढळ

Maharashtra Vidhanparishad Election : “मी शपथ घेतो/ घेते की ..” ; विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version