spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून श्री महावीर जैन हॉस्पिटलचा करण्यात आला गौरव

श्री महावीर जैन हॉस्पिटलकडून अभिमानाने घोषित करण्यात येत आहे की, दर महिन्याला भरविण्यात येणाऱ्या शिबिरांच्या रूपात दिल्या जाणाऱ्या असाधारण वैद्यकीय आरोग्य सेवेसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून हॉस्पिटलचा गौरव करण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२३ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी हॉस्पिटलचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अजित जे. शाह यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले.

ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये श्री. महावीर जैन हॉस्पिटलतर्फे नोव्हेंबर २०२२ पासून दर महिन्याला सर्वसाधारण शारीरिक स्थास्थ्य तपासण्यासाठीच्या सर्वसाधारण आरोग्य तपासण्या, त्वचारोग संसर्ग, नाक-कान-घसा (ईएनटी), नेत्रतपासणी शिबिरे भरविली जात आहेत, ज्यांत डॉक्टर्स आणि आरोग्यकर्मींच्या सहाय्याने रुग्णांना तपासणी-निदान-उपचारसुविधा पुरविल्या जात आहेत. या शिबिरांद्वारे कैद्यांच्या वैद्यकीय समस्यांकडे उत्तम प्रकारे लक्ष पुरविले जात आहे व त्यांची देखभाल घेतली गेली आहे व या गोष्टीची कारागृहाच्या अधिकारीवर्गाने दखल घेतली आहे. ही सर्व शिबिरे केवळ वैद्यकीय मूल्यमापन आणि उपचाराची दिशा दाखविण्यापुरतीच मर्यादित नव्हती त्यांनी उपचारांसाठी लिहून देण्यात आलेली औषधेही यावेळी रुग्णांना पुरविण्यात आली.

ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकारीवर्गाने श्री. महावीर जैन हॉस्पिटलचे वैद्यकीय सल्लागार, तंत्रज्ञ, परिचारक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, हॉस्पिटल व्यवस्थापन आणि विश्वस्त मंडळाचे कौतुक केले आहे व आपली कृतज्ञता व समाधान व्यक्त केले आहे. प्रशस्तीपत्र स्वीकारताना अजित शाह यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकारीवर्गाला शुभेच्छा दिल्या व आपली कृतज्ञता व्यक्ती केली. सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याप्रती श्री महावीर जैन हॉस्पिटलच्या कटिबद्धतेचा त्यांनी उल्लेख केला आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहाशी सहयोग साधत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. ही विश्वस्त संस्था शक्य त्या सर्व स्तरांतील मानवांना सेवा पुरविण्याप्रती कटिबद्ध असून यापुढेही संस्थेतर्फे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये मासिक तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, असे श्री महावीर जैन हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय विश्वस्त महेंद्र जैन यांनी सांगितले.

श्री महावीर जैन हॉस्पिटल विषयी –

श्री महावीर जैन हॉस्पिटल (एसएमजेएच) हा ठाणे महानगरपालिका आणि जेआयटीओ एज्युकेशनल ट्रस्ट व मेडिकल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम आहे. एसएमजेएचची स्थापना २०१९ साली ठाणे येथे झाली व ते ठाण्यातील काही सर्वोत्तम मल्टिस्पेश्यालिटी हॉस्पिटल्सपैकी एक आहे. या हॉस्पिटलद्वारे विविध प्रकारच्या वैद्यकीय आरोग्य सेवा पुरविल्या जातात. दर्जेदार आरोग्यसेवा सर्वांना नाममात्र किंमतीमध्ये सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी श्री महावीर जैन हॉस्पिटल, ठाणे प्रयत्‍नात आहे.
भेट द्या: http://mahavirjainhospital.com

हे ही वाचा : 

Valentine’s Day निम्मित कृतिका गायकवाडने दिल्या उर्फी स्टाईल शुभेच्छा

अखेर कोश्यारींच्या निरोपाची तारीख ठरली, शिवजयंती आधीच नवे राज्यपाल होणार विराजमान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss