spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्वच्छतेबद्दलच्या जागृतीसाठी ठाण्यात निघाला स्वच्छता मशाल मार्च

Thane : स्वच्छ शहराच्या जनजागृतीसाठी ठाणे महापालिकेतर्फे (thane municipal corporation) आज सकाळी ठाणे शहरात 'स्वच्छता मशाल मार्च' चे (Swachhata Mashal March) आयोजन करण्यात आले होते.

Thane : स्वच्छ शहराच्या जनजागृतीसाठी ठाणे महापालिकेतर्फे (thane municipal corporation) आज सकाळी ठाणे शहरात ‘स्वच्छता मशाल मार्च’ चे (Swachhata Mashal March) आयोजन करण्यात आले होते. स्वच्छोत्सव -२०२३ अंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये शून्य कचरा मोहिमेबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांचा कृतीशील सहभाग नोंदवण्यासाठी या मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी कोर्ट नाका चौक परिसरातून या स्वच्छता मशाल मोर्चाची सुरुवात झाली असून शहीद उद्यानात या स्वच्छता मशाल मोर्चाची सांगता झाली. दरम्यान या या स्वच्छता मशाल मार्चमध्ये अनेक ठाणेकर नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार आणि समाज विकास विभागाच्या उपायुक्त वर्षा दीक्षीत यांनी सहभागी नागरिकांचे यावेळी स्वागत केले.

शहीद उद्यानात स्वच्छता मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी उपस्थितांनी शहर स्वच्छ राखण्याची प्रतिज्ञा केली. एकल वापराचे प्लास्टिक आणि थर्माकोल यांचा वापर टाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, शून्य कचऱ्याचे उद्दीष्ट साध्य होईल, अशा जीवनशैलीचा अंगीकार करणे याचे स्मरण या प्रतिज्ञेच्या निमित्ताने करून देण्यात आले. ‘चला ठाणे बदलूया’ या उपक्रमांतर्गत महिला वॉर्ड कॅप्टनचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss