सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्टेशन, मॉल येथे कोरोना चाचण्या वाढवण्याचे ठामपा आयुक्तांचे निर्देश

Thane : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी राखीव असलेल्या विशेष वॉर्डबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्टेशन, मॉल येथे कोरोना चाचण्या वाढवण्याचे ठामपा आयुक्तांचे निर्देश

Thane : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी राखीव असलेल्या विशेष वॉर्डबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, रुग्ण संख्या आणि खाजगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्ण यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

सध्या ठाण्यात कोरोनाचे एकूण २५२ रुग्ण आहेत. कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढणे सुरू झाल्यापासून ०५ कोविडबाधितांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल तज्ज्ञांचे मत घेतले असता असे दिसून येते की, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, इतर गंभीर सहव्याधी यांच्यासह कोविडमुळे या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रुग्णांच्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी कोविड सदृश लक्षणे असतील तर आजार अंगावर काढू नये. तसेच, ज्येष्ठ नागरिक, व सहव्याधी असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी बुधवारी आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश बारोट, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, उप वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता हमरजकर, डॉ. प्रशिता क्षीरसागर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. राणी शिंदे, डॉ. मिलिंद उबाळे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सगळ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करून रुग्ण संख्येचा अभ्यास करणे हे कोरोनाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. चाचण्या अधिक केल्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कोविडबाबतच्या ‘चाचणी, विलगीकरण, उपचार’ या प्रोटोकॉल प्रमाणे अधिकाधिक रुग्ण विलगीकरणात ठेवणे व उपचार करणे आवश्यक ठरते. त्यामुळे, चाचणी केंद्रे एकही दिवस बंद ठेवू नयेत. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्टेशन, मॉल आदी ठिकाणी चाचणीची व्यवस्था तत्काळ केली जावी, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

ऑक्सीजन साठा, चाचणीच्या किट्सची पुरेशी उपलब्धता, औषधांचा पुरवठा यांच्याबद्दल काटेकोरपणे दक्ष राहावे, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी राखीव असलेल्या विशेष वॉर्ड बरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी कोविड काळात नेमण्यात आलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांची सेवा तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले आहेत. कोविडबाधित रुग्ण व्यवस्थापनात सदर कर्मचाऱ्यांचा कार्यक्षमपणे वापर होईल याची दक्षता घ्यावी असे आयुक्तांनी नमूद केले.

 

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version