Sunday, July 7, 2024

Latest Posts

चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री तर कार्यकर्ता खासदार, ठाण्यात Naresh Mhaske यांच्या विजयानंतर बॅनर्सची धूम

नरेश म्हस्के (Naresh Mhaske) विजयी झाले असून शिवसेना उबाठाच्या (Shivsena UBT) राजन विचारे (Rajan Vichare) यांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात आता शिवसैनिकांमध्ये बॅनरवॉर रंगले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election 2024 Result) देशभरात एनडीए आघाडी (NDA Alliance) आणि इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. एनडीएला बहुमत प्राप्त झाले असले तरीही इंडिया आघाडीनेही चमकदार कामगिरी करत २४० जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सर्वाधिक जागा मिळवल्या असून महायुतीला (Mahayuti) मात्र अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. अश्यातच बहुचर्चित ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Loksabha Constituency) शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) नरेश म्हस्के (Naresh Mhaske) विजयी झाले असून शिवसेना उबाठाच्या (Shivsena UBT) राजन विचारे (Rajan Vichare) यांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात आता शिवसैनिकांमध्ये बॅनरवॉर रंगले आहे.

ठाणे लोकसभेत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले असून ठिकठिकाणी नरेश म्हस्के यांच्या विजयाचे बॅनर्स लागले आहेत. ठाण्यातील अनेक मुख्य ठिकाणी नरेश म्हस्के यांच्या विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स दिसून आले आहेत. ठाण्यात एका ठिकाणी एका ठिकाणी ‘एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार’ अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजन विचारे यांच्या पराभवाचे देखील बॅनर्स लावले गेले आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी राजन विचारे यांच्या पराभवावर तसेच महाविकास आघाडीने मुंबईतील सहापैकी चार मतदारसंघांवर मिळवलेल्या विजयावर “गड आला पण सिंह गेला” अश्या आशयाचा बॅनर लावला होता. त्यामुळे ठाण्यात आता बॅनरवॉर रंगल्याचे दिसत आहे.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीला ठाण्यात तर सत्ता विरुद्ध निष्ठा असा रंग मिळाल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तसेच ही निवडणूक अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. शिवसेनेचे २ गट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाला उभारी दिली. एकही आमदार, नगरसेवक सोबत नसताना ठाण्यातून त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने लोकसभा निवडणूक लढविली. प्रचार देखील उत्तम रित्या सुरुवातीपासून शेवट पर्यंत पार पडला. सत्ता विरुद्ध निष्ठा अशी लढत सुरू असताना सर्वत्र राजन विचारे यांचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला जात होता. पण शेवटी नरेश म्हस्के यांनी बाजी मारत ठाण्याचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

हे ही वाचा:

“किरणजी, महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा आहे.”; Kiran Mane यांची पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत

‘गड आला पण सिंह गेला,’ Rajan Vichare यांच्या पराभवानंतर ठाण्यात बॅनरने वेधले लोकांचे लक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss