ठाणे महापालिकेच्यावतीने जागतिक हिवताप दिन साजरा

World Malaria Day : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने (Thane Municipal Corporation) नुकताच जागतिक हिवताप दिन (World Malaria Day) साजरा करण्यात आला.

ठाणे महापालिकेच्यावतीने जागतिक हिवताप दिन साजरा

World Malaria Day : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने (Thane Municipal Corporation) नुकताच जागतिक हिवताप दिन (World Malaria Day) साजरा करण्यात आला. मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी यंदा जागतिक आरोग्यसंघटनेमार्फत गुंतवणूक, नाविन्य आणि अंमलबजावणी हे धोरण जाहीर करण्यात आले आहे. शून्य हिवताप रुग्ण या मोहिमेसाठी हिवतापावरील उपचार आणि प्रतिबंध याबद्दल समाजात जनजागृती करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे, यासाठी ठाणे महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रात हिवताप दिनाचे औचित्य साधून रॅली तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

या शिबिरात उपस्थित परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हिवतापाबाबत घ्यावयाचे उपचार यांची माहिती देण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी हिवतापाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करावी. प्रत्येक आरोग्य कर्मचारी यांनी १०० घरांचे सर्वेक्षण करावे, डासांची उत्तपत्ती होत असलेल्या ठिकाणची माहिती घेवून त्यावर उपाययोजना म्हणून डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथामिक आरोग्यकेंद्रात घेतल्या जाणाऱ्या मासिक सभोमध्ये आशांना व आरोग्य कर्मचारी यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती द्यावी व हिवतापाबाबत जनजागृती करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र वाडिया येथे आशावर्कर, ए.एन.एम यांच्यामार्फत मलेरिया रुग्णास भेटी देवून त्यांची तपासणी करण्यात आली तसेच नौपाडा येथील आरोग्य केंद्रामध्ये हिवतापाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.

जागतिक हिवताप दिनानिमित महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आरोग्‌य केंद्रातील परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, डॉ. रमेश अय्यर, डॉ. प्रकाश सोनारीकर, डॉ. स्मिता वाघमारे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

५५ वर्षांवरील पोलिसांना उन्हात नो ड्युटी, पोलीस खात्याचा महत्वपूर्ण निर्णय

सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीचा शिंदेच्या शिवसेनेला रामराम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version