Thane News ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, शिंदे गटाकडून हल्ला झाल्याचा आरोप

Thane News ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, शिंदे गटाकडून हल्ला झाल्याचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane) चक्क भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा हल्ला शिंदे गटाच्या (Shinde Group) काही माजी नगरसेवकांच्या जमावाचा सांगण्यावरून करण्यात आला असे भाजप पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतो आहे. ही घटना ठाण्यातील वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात घडली असून या संदर्भात भाजपकडून ट्विट देखील करण्यात आलं आहे.आता भाजप आणि शिंदेगटाचा वाद उघडकीस आला आहे.

सध्या भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) हे एकत्रित सरकार चालवत आहेत. दोघेही मांडीला मंडी लावून सत्तेत बसले आहेत. पण मुख्यमंत्री शिंदेंचा (Shinde) बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जरा वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. ठाण्यातील भाजपचे (BJP) पदाधिकारी प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. हा हल्ला ठाण्यातील ठाण्यातील शिंदे गटाचे (Shinde Group माजी नगरसेवक विकास रेपाळे (Vikas Repale) आणि नम्रता भोसले (Namrata Bhosle) यांच्या जमावाने केला असल्याचा आरोप भाजप कडून करण्यात येतो आहे. या बाबत भाजप पदाधिकारी प्रशांत जाधव यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. एवढेच नाही तर “शिंदे गटाचे स्थानिक माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी या आधी देखील अशाच प्रकारे गुंडांच्या मदतीने हत्यार घेऊन आमच्या घरावर हल्ला केला” असा आरोप प्रशांत जाधव यांच्या भावाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी परबवाडी या परिसरात फलक बसवण्याच्या कारणावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाचे प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला होता. त्यावेळेस सपोलिसांनी हस्तक्षेप केला. नंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणाहून निघून गेले. पण शुक्रवारी काही जणांनी भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रश्नत जाधव यांच्या डोक्याला मार बसला आहे.प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यासंपूर्ण प्रकरणावर भाजपचे ठाण्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर भाजप कडून शिंदे गटाच्या विरोधात निषेध व्यक्त केला जातो आहे. तर आता यामुळे ठाण्यातील शिंदे गट विरुद्ध भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे आणि तो अजून पेटण्याचीही शक्यता आहे.

हे ही वाचा : 

Rishabh Pant ऋषभ IPL 2023 मध्ये खेळणार का? दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी कोणते पर्याय

Happy New Year 2023 वर्ष अखेरीस सेलेब्रेशनसाठी नागरिकांची चहेलपहेल सुरु

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version