spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Thane News दिवेकरांची नवी मुंबईत समाविष्ट करण्याची मागणी, लिहलं आयुक्तांना पत्र

एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra and Karnataka border) प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यावरून राज्यात राजकारण तापले आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात देखील सीमावादाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवा (Diva) परिसर ठाणे महापालिका हद्दीतून वगळण्याची मागणी “जागा हो दिवेकर” या संस्थेने केली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहे. गेले अनेक वर्षे ठाणे महापालिका क्षेत्रात असूनही अनेक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याचा दावा करत या संस्थेने दिवा परिसर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दिवा सीमावादाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्हे, शनिवारी कोल्हापुरात महाविकास आघाडीचे आंदोलन

जागा हो दिवेकर या संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे एका पत्रद्वारे केली आहे. ठाणे महापालिका (Thane Municipality) स्थापित होऊन जवळपास ४० वर्षे होऊन गेली. त्यात बरीच खारजमीन, खाडीप्रदेश समाविष्ट झाला. त्यात खूप मोठा भाग म्हणजे दिवा ग्रामीण परिसर आहे. ज्यात दातीवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई , पडले, खिडकाळी, शीळ, खार्डी असा बराचसा खाडीकिनारा परिसर ठाणे महापालिकेने खूप मोठी आश्वासने देऊन समाविष्ट करून घेतला. ज्याला आधीपासूनच भूमीपुत्नांचा विरोध होता. परंतु महापालिकेने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. परंतु दुर्दैवाने आम्ही ठेवलेला विश्वास हा ठाणो महापालिकेने फोल ठरविला आहे. आज इतकी वर्षे होऊन देखील येथील रहिवाशांना मुलभुत सोई सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे या पत्रत नमुद करण्यात आले आहे.

अभिजित बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना काळजी घेण्याचा दिला सल्ला

सुरूवातीला आम्हाला नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) सामील करून घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. परंतु आम्ही नकार देऊन नंतर ठाणे महापालिकेत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. ज्याचा आता आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. तरी आम्ही आमची चूक सुधारू इच्छित आहोत. त्यासाठी दिवा ग्रामीण व आजूबाजूच्या परिसराला नवी मुंबईत समाविष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. नवी मुंबईत देखील भरपूर परिसर दिव्याप्रमाणेच होते. परंतु अचूक नियोजन आणि पारदर्शक कारभारामुळे आज नवी मुंबईचा कायापालट आपण पाहत आहोत. म्हणूनच आम्हाला परत एकदा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे आणि आमची या सर्व नरकयातनातून सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

MCD निवडणुकीच्या विजयानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींचा घेतला आशीर्वाद, अन् म्हणाले

Latest Posts

Don't Miss