ठाणे रेल्वे स्थानकात आता हॅलीकॉप्टरचाही थांबा, पुनर्विकास आराखडा तयार

Thane Railway Station : भारतीय रेल्वे सेवेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे रेल्वेस्थानकावर (Thane Railway Station) रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचा (Helicopter) थांबा साकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाच्या (Indian Railways) वतीने घेण्यात आला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात आता हॅलीकॉप्टरचाही थांबा, पुनर्विकास आराखडा तयार

Thane Railway Station : भारतीय रेल्वे सेवेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे रेल्वेस्थानकावर (Thane Railway Station) रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचा (Helicopter) थांबा साकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाच्या (Indian Railways) वतीने घेण्यात आला आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाने तयार केला आहे. त्यानुसार फलाटावर अतिरिक्त जागेच्या निर्मितीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना जीवनदायी वेळेत उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी हवाईमार्गे वेगाने अंतर कापता येत. हेच महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या आवारात हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. व्यावसायिक इमारतीच्या छतावर हेलिपॅड उभारण्यात येईल.

ठाण्यात भविष्यातील गर्दी सुलभपणे हाताळता यावी, यांसह पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारे नवे पर्याय उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ठाणे स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाकडून घेण्यात आला आहे. स्थलांतरित रेल्वे वसाहतीमध्ये उभारल्या जाणाऱ्या इमारती आणि पूर्वेकडील सॅटिस इमारत अशा दोन जागा हेलिपॅडसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version