THANE SHRIKANT SHINDE: ग्रंथालयाचे लोकार्पण आणि अनेक विकासकामांचा आढावा

शोभा ग्राउंड मेटलनगर येथे १.१३ कोटी रुपयांच्या निधीतून बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. अशी माहितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

THANE SHRIKANT SHINDE: ग्रंथालयाचे लोकार्पण आणि अनेक विकासकामांचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने अंबरनाथ शहरात विविध प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. यातील काही प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्यांचे लोकार्पण होणार आहे. तर बहुतांश प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहेत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ.बालाजी किणीकर, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, प्रज्ञा बनसोडे, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये विकासकामांमध्ये अंबरनाथ शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाची आणि संयुक्त घनकचरा प्रकल्पाच्या कामाचा समावेश आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चिंचपाडा येथील नव्या ग्रंथालयाचे लोकार्पण केले. ८० लाख रुपयांच्या निधीतून या ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली असून यामध्ये तब्बल १ लाख पुस्तके आहेत. अंबरनाथ नगरपालिकेची नवीन भव्य अशी प्रशासकीय इमारत ४५.४३ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीची व्याप्ती वाढविण्यासाठी अतिरिक्त दोन मजल्यांचे बांधकाम करण्याचे नियोजन सुरू आहे. याबाबत  अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. तसेच खामकरवाडी आणि सर्वोदय नगर येथील रस्त्यांचे एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून काँक्रिटीकरणाचे काम सुरु असून येत्या काही दिवसात हे काम पूर्णत्वास जाणार आहे. या कामाची पाहणी करून रस्त्याचे काम दर्जेदार करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

यासोबतच, वुलन चाळ परिसरात ३.३० कोटी रुपयांच्या निधीतून तीन मजली रात्र निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच, सर्कस मैदान येथे सुमारे ३८ कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक नाट्यगृहाची उभारणी करण्यात येत असून याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. शोभा ग्राउंड मेटलनगर येथे १.१३ कोटी रुपयांच्या निधीतून बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. अशी माहितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

हे ही वाचा:

‘मी सुशांतच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती’,बिग बॉसच्या घरात अंकिताने सुंशातच्या मृत्यूबाबत केला खुलासा

MANOJ JARANGE-PATIL: २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे, आरक्षणाचा विजय महत्त्वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version