spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Thane : महिलांची कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये म्हणून, साध्या वेशात पोलीस तैनात…

Thane : लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्याची वेळ आली आहे. गणेश विसर्जन सोहळा आणि ईद-ए-मिलाद असे दोन्ही सण लागोपाठ आल्यामुळे ठाण्यात पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. दोन्ही सण शांततेत पार पडावी या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांच्या विशेष तुकड्या लावण्यात आल्या आहेत. ठाण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर ९ हजार पोलिसांचा चोवीस तास वॉच असणार आहे. तसेच मिरवणुकीत महिलांची कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस देखील तैनात करण्यात येणार आहेत.

आज १७ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाची गेले दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करून आज शेवटी विसर्जन केले जाणार आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासन सुद्धा सज्ज आहे. यंदाच्या विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे पोलिसांकडून बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला आहे. विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोर करण्यात आली आहे. ठाणे जिल्यात असंख्य सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जन केले जाणार आहे.

गणपती विसर्जनाच्या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्त स्वतः आशुतोष डुंबरे रस्त्यावर उतणार असून पाच परिमंडळातील चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, ९ डीसीपी, १८ एसीपी तसेच सुमारे १२५ पोलिस निरीक्षकांवर सुरक्षेची कमान सोपविण्यात आली आहे. याशिवाय एसआरपीच्या ५ कंपन्या, ४५०० पोलीस कर्मचारी, ७०० होमगार्ड आणि एक कंपनी रॅपिड अक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील मुख्य नाक्या-नाक्यावर,चौका-चौकात पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पोलिसांनी तडीपाराची कार्यक्रम हाती घेतला गेला आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने संयुक्त मिशन तडीपारी ऑपरेशन राबवले गेले आहे. अश्याप्रकारे पोलीस विभागाद्वारे महिला, लहान मुले तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खास खबरदारी घेतली जाते.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss