spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांसमोर पाणी टंचाईचे सावट

Thane : ठाणे शहरास पाणी पुरवठा (water supply) करणारी मुख्य जलवाहिनी मुंबई-नाशिक महामार्गालगत माणकोली पेट्रोलपंपाजवळ आज पहाटे पाचच्या सुमारास फुटली असल्याने ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

Thane : ठाणे शहरास पाणी पुरवठा (water supply) करणारी मुख्य जलवाहिनी मुंबई-नाशिक महामार्गालगत माणकोली पेट्रोलपंपाजवळ आज पहाटे पाचच्या सुमारास फुटली असल्याने ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. महापालिकेच्या जल विभागातर्फे या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुरुस्तीमुळे मंगळवार, सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, बुधवारपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात (Thane Municipal Corporation)  चार स्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (Maharashtra Industrial Development corporation) १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात.

काही दिवसांपूर्वी बोरवेलसाठीचे खोदकाम करत जल बोगदा फुटून दररोज पाच ते सात दशलक्ष लिटर पाणी गटारात आणि नाल्यात वाहून जात होते. तेव्हाही अशा प्रकारेचं ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबई व ठाणे येथे पाणीकपात असताना वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने स्थानिक नागरिकांचा संताप वाढताना दिसतो आहे.

हे ही वाचा : 

सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अमोल मिटकरी

Prashant Damle यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर रोवला झेंडा | All India Marathi Theater Council

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss