spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

न्यू होरायझन स्कॉलर स्कूलच्या प्रशासनाने दिले नाही अद्यापही उत्तर; पालक त्रस्त्र

ठाणे येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूल या विद्यालयाच्या विरोधामध्ये पालकांनी तक्रार केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण विभागाला अर्ज लिहिला आहे. त्या पत्रामध्ये पालकांनी विद्यालयाच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आंदोलनाचा मार्ग पत्कारला आहे. शाळेतील पालकांना वारंवार अनेक विषयी तक्रारी आहेत आणि त्यांना वारंवार त्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे.

ठाणे येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूल या विद्यालयाच्या विरोधामध्ये पालकांनी तक्रार केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण विभागाला अर्ज लिहिला आहे. त्या पत्रामध्ये पालकांनी विद्यालयाच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आंदोलनाचा मार्ग पत्कारला आहे. शाळेतील पालकांना वारंवार अनेक विषयी तक्रारी आहेत आणि त्यांना वारंवार त्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे. शाळेत तक्रार करून सुद्धा शाळेकडून समानधनकारक उत्तर न मिळाल्यामुळे पालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी न्यू होरिझन स्कॉलर्स स्कूल, कावेसर ठाणे येथे जमलेले सुमारे 300 हुन अधिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, 2022 च्या निर्धारित सरकारी कायद्यापेक्षा जास्त फी वाढीचा मुद्दा तसेच DFRC अधिसूचना, प्रवासाची शुल्क वसुली अशा अनेक समस्यांबाबत शाळा आजपर्यंत कोणतेही उत्तर मिळालेले नाही म्हणून हा आंदोलनाचा स्रोत या पालकांनी वापरला. त्याचबरोबर स्कूल बस आणि मोठा दंड वसूल केला आहे जो माफ करावा अशी मागणीही ह्यावेळी पालकांकडुन करण्यात येत होती. ज्याला शाळा प्रशासन कोणतेही उत्तर देत नव्हती. पालकांकडून हर एक पद्धतीने ट्विटर , फेसबुक, ई-मेल द्वारे पालकांना उत्तराची अपेक्षा होती. फी वाढीबद्दल मुख्याध्यापकांना पत्र पाठवले तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा रिव्हर्ट आला नाही.

गेल्या एक – दीड महिन्यापासून पालकांनी मूक संमेलनात आपली एकता व्यक्त केली आणि आचारसंहितेचे पालन केल्याने शांतता राखण्याच्या उद्देशाने ऐक्य आणि एकतेची शक्ती दाखवली. 2022 च्या निर्धारित सरकारी कायद्यापेक्षा जास्त फी वाढीचा मुद्दा तसेच DFRC अधिसूचना, प्रवासाची शुल्क वसुली अशा अनेक समस्यांबाबत शाळा आजपर्यंत उत्तर देत नाही. स्कूल बस आणि मोठा दंड वसूल केला आहे जो माफ करावा अशी मागणीही ह्यावेळी पालकांकडुन करण्यात येत होती. शाळेला विनवणी करून सुद्धा पालकांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या मागण्या साधारतः शाळेची फी वाढ, संपूर्ण वर्षासाठी वाहतूक शुल्क आगाऊ, वॉशरूमची स्वच्छता,एसी बंद ,एकाच विक्रेत्याकडून खूप जास्त दराने पुस्तके खरेदी करण्याची सक्ती, कोणत्याही उपक्रमाता पालकांना बंदी, लिफ्टचा वापर नाहीअशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तरी अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

हे ही वाचा : 

ऐरोलीत शाळेच्या विरोधात पालकांच्या तक्रारी

एकच परिवारात तीन पिढ्यांमध्ये समाजसेवेचा वारसा पहिल्यांदी बघितला – अमित शहा

शरद पवार अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय घडलं? राऊतांच्या दाव्याने राजकीय चर्चेला उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss